AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओठांना आकर्षक बनवणाऱ्या लिपस्टीकमध्ये असतं नॉनव्हेज ? फॅक्टरी ते मेकअप किट पर्यंतचा प्रवास…

लिपस्टिक निर्मितीबाबतची एक फारशी माहीत नसलेली गोष्ट म्हणजे, काही चमकदार आणि मॉइश्चरायझिंग शेड्समध्ये माशांपासून मिळवलेल्या घटकांचा समावेश असतो. चला यामागचं संपूर्ण सत्य जाणून घेऊया.

ओठांना आकर्षक बनवणाऱ्या लिपस्टीकमध्ये असतं नॉनव्हेज ? फॅक्टरी ते  मेकअप किट पर्यंतचा प्रवास...
लिपस्टीकमध्ये नॉनव्हेज असतं का ? Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 11, 2026 | 3:28 PM
Share

जगात अशा फारच कमी महिला असतील, ज्यांच्या मेकअप बॉक्समध्ये लिपस्टिक नसेल. ऑफिसला जायचे असो, एखाद्या लग्नाला किंवा पार्टीला हजेरी लावयची असेल, किंवा अगदी साध्या कार्यक्रमाला जायचे असो – लिपस्टिकशिवाय महिलांचा लूक अपूर्णच वाटतो. आज कॉस्मॅटिक्सच्या मार्केटमध्ये आकर्षक रंगछटा आणि विविध प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, महिलांच्या ओठांचे सौंदर्य खुलवणाऱ्या लिपस्टिकबाबत सोशल मीडियावर वारंवार एक दावा केला जातो. लिपस्टिकच्या निर्मितीमध्ये माशांच्या तेलाचा (फिश ऑइल) वापर केला जातो, असे अनेकदा इंटरनेटवर सांगितले जाते. आपण नकळतपणे आपल्या ओठांवर मांसाहारी घटकांपासून बनलेली उत्पादने लावत आहोत का, असा प्रश्न अनेकदा महिलांना पडतो. याबददल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

काय आहे सत्य ?

खरंतर वस्तुस्थिती अशी आहे की सर्वच लिपस्टिक्समध्ये माशांचे तेल (fish oil) नसते. एखादी साधी लिपस्टिक तयार करण्यासाठी प्रामुख्याने मेण, विविध तेल, पिगमेंट (कलरंट्स) आणि विशिष्ट रसायने यांसारख्या घटकांचा वापर केला जातो. जरी काही विशिष्ट शेड्स आणि ब्रँड्सच्या लिपस्टिक्समध्ये माशांपासून मिळवलेले घटक वापरले जात असले, तरी सर्व लिपस्टिक्सना हे लागू होत नाही.

बाजारात मिळणाऱ्या काही लिपस्टिक्समध्ये अनेकदा एक विशिष्ट प्रकारची चमक किंवा मोत्यासारखी आभा (पर्ल-इफेक्ट) दिसून येते. एका अहवालानुसार, अतिशय चमकदार (shimmery किंवा pearlescent इफेक्ट असलेल्या) लिपस्टिक्समध्ये ‘ग्वानिन’ (Guanine) नावाचा एक विशेष घटक मिसळला जातो. हा घटक हेरिंगसारख्या विशिष्ट माशांच्या बाह्य थरापासून विशेषतः त्यांच्या खवल्यांपासून, मिळवला जातो.

हा  ‘ग्वानिन’ (guanine) घटकच महिलांच्या ओठांना एक सुंदर चमक आणि मोत्यासारखी लकाकी (pearlescent effect) प्रदान करतो. बऱ्याच जणांना हे वाचून आश्चर्य वाटेल पण, या घटकाचा वापर केवळ लिपस्टिकमध्येच नाही, तर नेल पॉलिश आणि आयशॅडोमध्येही मोठ्या प्रमाणावर केला जातो.

लिपस्टिक लावल्यानंतर ओठांना मिळणारा ओलावा आणि मऊपणा यामागेही एक मोठं आणि महत्वाचं गुपित आहे. ओठांमधील ओलावा आणि मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी लिपस्टिकमध्ये ‘स्क्वालीन’ (squalene) वापरतात. स्क्वालिन (Squalane) हे प्रामुख्याने शार्क माशाच्या यकृतातील तेलापासून मिळवलं जातं. मात्र, बदलत्या काळानुसार अनेक आधुनिक आणि नामांकित कंपन्यांनी यावर पर्याय शोधला आहे. आज अनेक प्रमुख ब्रँड्स, हे शार्कच्या तेलाऐवजी वनस्पती-आधारित स्क्वालिन (ऑलिव्हसारख्या नैसर्गिक स्रोतांपासून मिळवतात) किंवा कृत्रिम (सिंथेटिक) स्क्वालिनचा वापर करतात.

जुन्या लिपस्टीक्समध्ये काय ?

मात्र असं असलं तरीही, जुन्या आणि अत्यंत स्वस्त लिपस्टिक्समध्ये माशांच्या तेलाचा (fish oil) पारंपरिक वापर अजूनही दिसून येतो. प्रमाणित लिपस्टिक तयार करण्यासाठी फॅक्टरीमध्ये एकत्र मिसळल्या जाणाऱ्या मूलभूत घटकांविषयी जाणून घेऊया.

कशी तयार होते लिपस्टीक ?

लिपस्टिकचा आकार तर सर्वांना माहीत असेलच. तर असा भरीव आणि सुस्पष्ट आकार देण्यासाठी कँडेलिला वॅक्स, कार्नौबा वॅक्स किंवा सामान्य मधमाशीचे मेण (बीज-वॅक्स) यांचा मुख्य घटक म्हणून वापर केला जातो. त्यानंतर, ती मऊ व मुलायम बनवण्यासाठी आणि ओठांवर सहजपणे फिरवता यावी यासाठी एरंडेल तेल, जोजोबा तेल, खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल आणि कोको बटर यांसारख्या उत्तम गुणवत्तेच्या घटकांचा त्यात समावेश केला जातो.

याव्यतिरिक्त, लिपस्टिकमध्ये हवा तो रंग यावा, यासाठी विविध प्रकारचे पिगमेंट्स (pigments) आणि अनेक सुगंधांचा वापर केला जातो. लिपस्टीकच्या निर्मिती प्रक्रियेची सुरुवात पिगमेंट्स निश्चित करण्यापासून होते. ही पिगमेंट्स म्हणजे विशिष्ट प्रकारचे रंग देणारे घटक असतात; आकर्षक रंग आणि नव्या शेड्सची श्रेणी तयार करण्यासाठी ते अचूक प्रमाणात मिसळले जातात.

एकदा का रंगांचं अचूक मिश्रण तयार झालं की, ते तेलामध्ये पूर्णपणे एकजीव केलं जात. या प्रक्रियेदरम्यान, तेल आणि पिगमेंट यांचं प्रमाण 2:1 इतकंच राहील याची काळजी घेतली जाते.  रंगद्रव्य आणि तेल यांचे हे दाट मिश्रण तयार केल्यानंतर, ‘मोल्डिंग’ (molding) म्हणून ओळखला जाणारा पुढचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा येतो. या प्रक्रियेत, संपूर्ण मिश्रण एका विशिष्ट आणि अत्यंत अचूक तापमानापर्यंत तापवलं जातं आणि ते पूर्णपणे शिजवलं जातं. त्यानंतर लगेचच, जराही वेळ न लावता, ते गरम द्रव्य खूप वेगाने थंड केलं जातं.

थंड करण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, त्या दाट द्रव मिश्रणामध्ये हवेचे बुडबुडे किंवा हवेची पोकळी निर्माण होणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी लागते. साच्यांमध्ये हे मिश्रण पूर्णपणे सेट होऊन थंड व घट्ट झाले की, तयार झालेले प्रॉडक्ट त्यातून काळजीपूर्वक बाहेर काढलं जातं. बाहेर काढल्यानंतर, ते सुंदर लिपस्टिक स्टिक्सच्या स्वरूपात समोर येतात. अशा प्रकारे आकर्षक लिपस्टीक तयार होते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा