AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतत एसीत राहिल्याने त्वचेला त्रास होतो का? घरच्या घरी असे उपचार करू शकता

यंदाचा उन्हाळ्याने उष्णतेचे आजवरचे विक्रम मोडीत काढले. वाढलेल्या उकाड्यामुळे एसीत राहणंच पसंत केलं जातं. पण सतंत एसीच्या थंडाव्यात राहिल्याने त्वचेवर परिणाम होता. त्वचा कोरडी पडते, असं बोललं जातं. जर तसं झालं तर घरगुती काय उपचार करता येतील जाणून घ्या.

सतत एसीत राहिल्याने त्वचेला त्रास होतो का? घरच्या घरी असे उपचार करू शकता
सतत एसीत राहिल्याने त्वचेला त्रास होतो का? घरच्या घरी असे उपचार करू शकताImage Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Jun 02, 2026 | 9:48 PM
Share

उन्हाळ्यात बाहेर पडल्यानंतर उकाड्याने जीव कासावीस होतो. कधी एकदाचं घरी किंवा ऑफिसात पोहोचतो आणि एसीत बसतो असं होतं. कारण यंदा उकाड्याने जगणं असह्य झालं आहे. त्यामुळे आराम मिळावा यासाठी एसीत राहण्याला पसंती दिली जाते. पण एसीच्या थंड वातावरणात राहिल्याने फक्त आरोग्याचंच नाही तर त्वचेचंही नुकसान होते. पबमेडनुसार काही रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. कमी आर्द्रता असलेल्या वातानुकूलित वातावरणामुळे त्वचेच्या कोरडेपणाची लक्षणे उद्भवू शकतात. आर्द्रतेचाही त्वचेवर महत्त्वाचा परिणाम होऊ शकतो. त्वचेच्या वरच्या थरातील (स्ट्रॅटम कॉर्नियम) पाण्याच्या प्रमाणात बदल होतो, त्वचेची लवचिकता कमी होते आणि खडबडीतपणा वाढतो. सतत वातानुकूलित खोलीत राहिल्याने आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव होते का? आम्ही या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत आणि अशा परिस्थितीत आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात..

या गोष्टी लक्षात ठेवा

  • मॉइश्चरायझरचा वापर करा: जर तुमची त्वचा कोरडी असेल किंवा एसी बसून तसं झालं असेल तर काळजी घेणं आवश्यक आहे. मॉइश्चरायझरचा वापर करा. यामुळे त्वचेतील शुष्कपणा कमी होईल आणि त्वचा तजेलदार राहण्यास मदत होईल. तसेच एसीचं तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान ठेवा. जेणेकरून शरीरासाठी तापमान अनुकूल राहील. सलग एसीत बसू नका आणि एक दीड तासांनी पाच मिनिटांचा ब्रेक घ्या.
  • सुती आणि सैल कपडे घाला: उन्हाळ्यात सुती आणि सैल कपडे घालणं फायद्याचं ठरेल. कारण त्यामुळे तुमचं शरीर थंड राहिल. तसेच तीव्र उष्णतेचा त्रास जाणवणार नाही. तसेच एसीत जास्त वेळ राहण्याची गरजही भासणार नाही. तसेच प्राणायाम करून शरीर राहण्यात मदत होईल.
  • कोरफड वापरा: कोरफडमध्ये त्वचेला नैसर्गिरित्या मॉइश्चराइझ करण्याचे गुणधर्म आहेत. त्यातील बॅक्टेरिया विरोधी गुणधर्मामुळे खाज आणि जळजळ कमी होते
  • खोलीत पाण्याचा ग्लास ठेवा: सध्या ही बाब सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. त्यामुळे याबाबत बरंच काही सांगितलं आहे. एसी असलेल्या खोलीत पाण्याचा ग्लास ठेवला तर फायदा होतो. एसी हवेतील सर्व ओलावा शोषून घेते. पाण्याच्या ग्लासमुळे हवेतील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे त्वचा, ओठ आणि हातपाय कोरडे पडत नाहीत.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा