Dry skin problem : त्वचा कोरडी पडलीय? करू नका दुर्लक्ष, अन्यथा भोगावे लागतील “या” आजाराचे गंभीर परिणाम!

प्रदीप गरड

Updated on: Feb 20, 2022 | 11:25 AM

Dry skin problem : थंडीच्या दिवसात अनेकांना त्वचा कोरडी पडण्याची समस्या जाणवते परंतु अनेकदा आपली त्वचा कोरडी होण्यामागे वातावरणच कारणीभूत असते असे नाही.अनेकदा एखादा गंभीर आजार सुद्धा आपली त्वचा कोरडी पडण्यासाठी निमित्त ठरू शकतो.

Dry skin problem : त्वचा कोरडी पडलीय? करू नका दुर्लक्ष, अन्यथा भोगावे लागतील या आजाराचे गंभीर परिणाम!
प्रातिनिधिक छायाचित्र

Dry skin problem : थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडणे (Dry skin) ही सर्वसाधारण बाब आहे. थंडीच्या दिवसात अनेकांना त्वचा कोरडी पडण्याची समस्या सतावत असते. थंडीच्या दिवसात बाहेरील कमी असलेले तापमान आणि अनेकदा आपण पाणी कमी पितो यामुळे आपली त्वचा खूपच कोरडी होते, त्यामुळे त्वचेवर खाज (Itching) येऊ लागते. असे अनेक लोक आहेत की ज्यांची त्वचा प्रत्येक वातावरणामध्ये कोरडीच असते. अनेकदा डिहायड्रेशन आणि कोरडी हवा या कारणामुळे सुद्धा आपली त्वचा कोरडी राहते. अनेक व्यक्ती आपली त्वचा कोरडी होण्यामागे वातावरण कारणीभूत आहे असे सांगत असतात. परंतु आपल्या सर्वांना एक गोष्ट समजून घ्यायला हवी, की प्रत्येक वेळी आपली त्वचा कोरडी होण्यामागे वातावरण कारणीभूत ठरेल असे नाही. या कारणामागे एखादा गंभीर आजार (Dangerous disease) सुद्धा असू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जर तुमची त्वचा वारंवार कोरडी पडत असेल आणि त्वचेवर खाज येत असेल तर यामागे नेमके काय कारण असू शकते याबद्दल सांगणार आहोत.

गंभीर आजार?

त्वचा कोरडी पडण्यामागे एक गंभीर आजार असू शकतो तो म्हणजे किडनीचा आजार होय. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतु हे सत्य आहे. जर तुमची त्वचा वारंवार कोरडी होत असेल तर अशा वेळी तुम्हाला भविष्यात किडनीचा आजार होण्याची शक्यता असते.

किडनीच्या समस्यांमुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते?

किडनी हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण कार्य पार पाडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपल्या शरिरातील रक्त फिल्टर करणे आणि अन्य पोषक तत्व जसे की कॅल्शिअम आणि पोटॅशियम यांचे संतुलन राखण्याचे कार्य किडनी करते सोबतच किडनीमधून असे काही हार्मोन्स बाहेर काढले जातात जे अन्य अवयवांच्या कार्यासाठी लाभदायी ठरतात. जर आपल्या शरीरामध्ये पोषकतत्व भरपूर प्रमाणात असतील तर अशा वेळी आपली त्वचा कोरडी पडत नाही. त्वचा नैसर्गिकरीत्या हायड्रेट आणि निरोगी राहते. जेव्हा आपल्या शरीरातील किडनी योग्य पद्धतीने कार्य करत नाही अशा वेळी रक्तातील खनिज व पोषक तत्व यांचे असंतुलन होते, जे भविष्यात किडनीचा आजार उद्भवण्याचा संकेत दर्शवत असते.

मॉइश्चर निघालेले असेल तर…

जर तुमची त्वचा वारंवार कोरडी पडत असेल, त्वचेचे मॉइश्चर निघालेले असेल यामुळे त्वचेवर वारंवार खाज येते ही सगळी लक्षणे तुमची किडनी व्यवस्थितरित्या काम करत नाही असे दर्शविते. अमेरिकन अॅकेडमी ऑफ डर्मेटोलॉजी यांच्या मते, त्वचासंबंधित अनेक लक्षणे किडनीच्या आजाराचे संकेत ठरू शकतात.

– त्वचेवरील पांढरे डाग आणि पापडीदार त्वचा

– त्वचा कोरडी पडून त्वचेवर भेगा पडणे

– त्वचेवर माश्यांसारखे खवले पडले आहे असे जाणवणे

वरील लक्षणे तुम्हाला तुमच्या शरीरावरील कोणताही अवयवांवर दिसून येतील. अशी काही लक्षणे दिसताच तुम्हाला त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

किडनीची समस्या असल्यास शरीरावरील ‘या’ भागांवर खाज येते

तुम्हाला किडनीची समस्या झाली असेल तर अशावेळी त्याचा परिणाम प्रत्येकाला वेगळा जाणवत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. त्वचा कोरडी पडणे आणि खाज येणे ही समस्या शरीराच्या एखाद्या विशेष जागेवर सुद्धा होऊ शकते, जसे की पाठ किंवा हात. ज्येष्ठ नागरिकांमध्ये किडनीचा आजार होण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच जर तुम्हाला त्वचेवर वारंवार खाज येत असेल, त्वचा नेहमी कोरडी पडत असेल तर अशा वेळी या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना भेट देणे गरजेचे आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये संतुलित व सकस आहार आपल्याला सेवन करायला हवा. किडनीचे आरोग्य चांगले राहील याकरिता काही पथ्य देखील पाळणे आवश्यक आहे. नेहमी त्वचा कोरडी पडू नये याकरीता चांगल्या गुणवत्तेचे एखादे बॉडी लोशन सुद्धा तुम्ही वापरू शकता.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे. तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाही. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असल्यास घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

आणखी वाचा :

वजन कमी करण्यासाठी तुम्ही उच्च प्रथिने आहार घेत आहात? मग या 5 डाळींचा नक्की समावेश करा!

केसांपासून त्वचेपर्यंत नाभी थेरपी ‘या’ समस्यांवर उपचार करते, जाणून घ्या अधिक!

झोपेतून जागे होताच मोबाईल वापरण्याची सवय? भविष्यात गंभीर आजारांना देताय निमंत्रण!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI