Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

prajwal dhage

|

Updated on: Feb 24, 2021 | 5:43 PM

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल (Don't make these 5 mistakes by mistake in changing weather, you will get sick)

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

Follow us on

मुंबई : सध्या हवामानात खूप बदल होत आहेत. सकाळी-संध्याकाळी थंडी आणि दुपारी गर्मी होतेय. जोपर्यंत उन्हाळा सुरु नाही तोपर्यंत हवामानात हे बदल होत राहतील. बदलत्या हवामानात काळजी घेतली पाहिजे. थोडासा बेजबाबदारपणाही तुम्हाला आजारी करु शकतो. यासाठी तुम्हाला काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. (Don’t make these 5 mistakes by mistake in changing weather, you will get sick)

कपडे : सध्या पहाटे आणि संध्याकाळी थंड वातावरण असते. अशावेळी शॉर्ट हाताचे कपडे घालू नका. अजून गरमीचा ऋतू सुरु झाला नाही त्यामुळे तुम्ही उबदार कपडे घालू शकता. संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घाला. त्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाहीत. फुल हाताचे कपडे घातल्यामुळे तुमची त्वचा टॅन होत नाही.

जेवण : थंडीच्या दिवसात उष्ण खाद्यपदार्थ खाणे आवडते तर गरमीच्या दिवसात थंड पदार्थ खाण्यास पसंती असते. खाण्या-पिण्यातील हे बदल एकदम करु नका. थंड पाणी प्यायल्याने किंवा अति थंड वस्तू खाल्ल्याने गळा खराब होऊ शकतो किंवा सर्दी, पडसे होऊ शकते. अशा वेळी तळलेले पदार्थही आरोग्यासाठई हानिकारक ठरु शकतात.

एसीपासून दूर रहा : सर्वांनी आता हिटर किंवा ब्लोअरचा वापर करणे बंद केले असेल. हवामानातील सौम्य थंडी आणि गर्मीचा आनंद घ्या. दुपाच्या वेळी अधिक गरम होते तरीही एसी लावू नका. सध्या एसीच्या थंडाव्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. यापेक्षा घरातील खिडक्या दरवाजे उघडे ठेवा आणि ताजी नैसर्गिक हवा घ्या.

उन्हात फिरु नका : कडक उन्हात फिरल्यास तुम्ही आजारी पडू शकता. यावेळी शरीर हवामानातील बदलांसाठी अनुकूल नसते. त्यामुळे कडक उन्हामुळे ताप येऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या वातावरणात अधिक वेळ उन्हात जाणे टाळा.

जेष्ठ नागरिक आणि मुलांची काळजी घ्या : बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक परिणाम जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर होतो. अशा वेळी आईस्क्रीम, थंड पेय आणि दही यापासून दूर रहा. हलके कपडे घाला. थंड पाण्याने अंघोळ करु नका. (Don’t make these 5 mistakes by mistake in changing weather, you will get sick)

संबंधित बातम्या

Food Tips | आयुर्वेद सांगतंय मधासोबत ‘या’ गोष्टी खाऊ नका एकत्र, अन्यथा आरोग्याला होऊ शकते हानी!

High Blood Pressure | उच्च रक्तदाबाची दोन लक्षणे, डोळे आणि चेहऱ्यावरुन ओळखा आजार

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI