AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या ‘मनुक्याचे पाणी’, पाहा रेसिपी !

कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप महत्वाचे आहे. कारण देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतच चालेला आहे.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या 'मनुक्याचे पाणी', पाहा रेसिपी !
मनुके
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 13, 2021 | 10:55 AM
Share

मुंबई : कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप महत्वाचे आहे. कारण देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतच चालेला आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली तर आपण या काळातही सुरक्षित राहू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. (Drink to boost the immune system raisins water)

मनुके खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. द्राक्ष सुकवून मनुके तयार केली जातात. मनुक्यामध्ये विविध प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिज आढळतात, जे आपल्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहेत. मनुक्याचे पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरास बर्‍याच फायद्यांसह ऊर्जा मिळेत. विशेष म्हणजे मनुक्याचे पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मनुक्याचे पाणी तयार करण्याासाठी दोन कप पाणी आणि 150 ग्रॅम मनुका घ्या. एका भांड्यात पाणी उकळा.

जेव्हा पाणी पूर्णपणे उकळले जाईल, तेव्हा त्यात मनुका घाला आणि रात्रभर भिजत ठेवा. नंतर सकाळी पाणी मोठ्या आचेवर तापवा. हे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. परंतु, हे लक्षात ठेवा की हे पाणी प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका. हे पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कोरोनाच काय इतरही अनेक आजारांपासून आपण सुरक्षित राहू शकतो. या पाण्यात उपस्थित अँटीऑक्सिडेंट्स आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यास उपयुक्त ठरतात.

दररोज सकाळी रिकाम्या हे पाणी पोटी प्या. हे आपल्या प्रतिकारशक्तीला चालना देते. दररोज या पाण्याचे सेवन केल्यास तुमच्या शरीरात जमा होणारे हानिकारक घटक दूर होतील. हे पाणी आपले यकृत स्वच्छ करते आणि शरीराचे रक्त साफ करण्यास देखील मदत करते. जर आपणास बर्‍याचदा आंबटपणाची समस्या उद्भवली असेल, तर मग मनुकाचे पाणी आपल्यासाठी बरेच समाधानकारक सिद्ध होऊ शकते.हे पाणी आपल्या पोटातील आम्ल नियंत्रित करते आणि त्वरीत अपचनापासून मुक्त करते.

मनुकामध्ये बोरॉन आणि कॅल्शियम असतात, जे हाडे तयार करण्यात मदत करतात आणि शरीर निरोगी ठेवतात.हे पाणी आपल्या हृदयासाठी खूप प्रभावी आहे. हे आपले हृदय निरोगी करण्यास मदत करते. तसेच, आपल्या शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयाच्या आरोग्यास सुधारते. जर सकाळी रिकाम्या पोटी मनुकाचे पाणी प्यालेले असेल, तर ते आपले वजन देखील कमी करते. यात भरपूर फ्रुक्टोज आणि ग्लूकोज असतात, जे आपल्या शरीरातील ऊर्जा गमावू देत नाहीत. त्यामध्ये फायबर देखील असते, ज्याने आपले पोट भरते.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!

Healthy Diet | डाएटमध्ये करा हिरव्या भाज्यांचा समावेश, होतील अनेक फायदे!

(Drink to boost the immune system raisins water)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...