श्रावण महिन्यात उपवासाच्या दिवशी घरी बनवा ‘हे’ 3 चविष्ट गोड पदार्थ, जाणून घ्या रेसिपी
श्रावण महिना काही दिवसांनी सुरू होणार आहे. बहुतेक लोकं श्रावणात उपवास सोडल्यानंतर गोड पदार्थ खातात. यासाठी यंदाच्या श्रावण महिन्यात उपवास सोडताना या झटपट तीन गोष्ट चविष्ट पदार्थ बनवून पहा. हे गोड पदार्थ बनवायला खूप सोपे आहेत.

यंदा श्रावण हा 25 जुलै 2025 रोजी सुरू होणार आहे. शिवभक्तांसाठी हा महिना खूप खास असल्याने ते या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. या श्रावण महिन्यात भगवान शिव आणि पार्वती देवीची पूजा केली जाते. तसेच आपल्यापैकी बहुतेकजणंही श्रावणातील प्रत्येक सोमवार व शनिवार उपवास करतात. तर अनेकजण हे संपूर्ण श्रावण महिना उपवास करत असतात.
जर तुम्हीही श्रावणात उपवास करत असाल तर अनेक ठिकाणी उपवास सोडताना गोड पदार्थ खाण्याची परंपरा आहे. पण तुम्ही या श्रावण महिन्यात उपवासानंतर या तीन प्रकारचे गोड चविष्ट पदार्थ बनवा. चला तर मग आजच्या या लेखात आपण या झटपट होणाऱ्या गोड पदार्थांच्या रेसिपी बद्दल जाणून घेऊयात…
मखाना मलाई खीर
मखान्या पासून खीर बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करा. त्यानंतर त्यात मखने टाकून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत तळा.
मखाने थंड झाल्यावर ते बारीक करून घ्या, तुम्ही काही मखने अख्खे सोडू शकता. आता एका पॅनमध्ये दूध टाका.
आता काही वेळाने दूध उकळू लागले की, ज्वाळ कमी करा आणि ते थोडे घट्ट होईपर्यंत 10 ते 15 मिनिटे शिजवा. मध्येमध्ये ढवळत राहा, जेणेकरून ते पॅनला चिकटणार नाही आणि त्यातून दुध बाहेर येणार नाही.
आता त्यात भाजलेले आणि कुस्करलेले मखाना टाका. मंद आचेवर 10 ते 12मिनिटे शिजवा.
आता एका लहान पॅनमध्ये एक चमचा तूप टाका आणि त्यात ड्रायफ्रु्स भाजून घ्या. नंतर ड्रायफ्रुटस थंड झाल्यावर खीरमध्ये टाका.
तुम्हाला हवे असल्यास यात वेलची पावडर आणि केशर देखील मिक्स करू शकता. आता त्यात तुमच्या चवीनुसार साखर टाकून 5 मिनिटे शिजू द्या.
या दरम्यान खीर थोडी पातळ होऊ शकते, परंतु थंड झाल्यावर ती घट्ट होईल.
साबुदाणा खीर केशर
साबुदाणा केशर खीर ही चविष्ट गोड डिश बनवण्यासाठी, सर्वप्रथम साबुदाणा 5 ते 6 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवा. लक्षात ठेवा की पाणी साबुदाणा बुडवण्याइतके असावे. भिजवल्यानंतर ते फुगेल.
त्यानंतर 2 चमचे गरम दूध घ्या आणि त्यात केशराचे धागे टाका आणि 10 मिनिटे बाजूला ठेवा.
यानंतर, तुमच्या गरजेनुसार दूध उकळत ठेवा. दूध उकळले की, त्यात भिजवलेला साबुदाणा टाका.
गॅस मंद आचेवर ठेवा आणि सतत ढवळत राहा जेणेकरूनसाबुदाणे पॅन किंवा भांड्याला चिकटणार नाही.
सुमारे 15 ते 20 मिनिटे शिजवा. खीर घट्ट होईल. आता चवीनुसार साखर, वेलची पावडर आणि केशराचे दूध मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बारीक केलेल ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता. खीर काही मिनिटे शिजू द्या. तुमच्या आवडीनुसार गरम किंवा थंड सर्व्ह करा.
शिंगाड्याचा हलवा
एका पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात शिंगाड्याचे पीठ टाका आणि ते मंद आचेवर सतत परतून घ्या.
व्यवस्थित परतून झाल्यावर पीठाला हलका सुगंध येऊ लागेल आणि रंग हलका सोनेरी होईल. आता हळूहळू पाणी किंवा दूध टाका आणि ढवळत राहा जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत.
मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात साखर मिक्स करा. साखर विरघळल्यानंतर हलवा आणखी घट्ट होईल.
आता तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करू शकता. हे मिश्रण जेव्हा होईल हलके तूप सोडू लागते आणि बाजूंनी वेगळे होऊ लागते तेव्हा गॅस बंद करा आणि सर्व्ह करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
