बीटाचा ‘या’ प्रकारे वापर केल्यास ओठ होतील गुलाबी, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक
बीटमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात आणि ते तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण ओठांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी बीटचा वापर कसा करावा ते जाणून घेऊयात.

बदलत्या ऋतू नुसार आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो तसेच त्वचेची काळजी घेणे हे निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्वचेची नैसर्गिक चमक राखण्यापासून ते नुकसानापासून संरक्षण करण्यापर्यंत त्वचेची स्वच्छता, मॉइश्चरायझिंग आवश्यक आहे. कधीकधी थोड्याशा निष्काळजीपणामुळे त्वचेचा रंग कमी होऊ लागतो आणि आपला चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही केमिकलयूक्त प्रोडक्टचा वापर न करता नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. कारण हे उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. या लेखात आपण बीटाबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या चेहऱ्याचा रंग सुधारण्यास तसेच ओठ स्वच्छ करण्यास कसे मदत करते. कारण बीटांचा वापर हा अनेक ब्युटी प्रोडक्टमध्ये देखील केला जात आहे. बीट खाण्यासोबतच तुम्ही ते त्वचेवर देखील लावू शकता.
हेल्थ लाईनच्या मते, बीटमध्ये प्रथिने आणि फायबर व्यतिरिक्त पाण्याचे प्रमाण चांगले असते. याशिवाय फोलेट म्हणजेच व्हिटॅमिन बी9 आणि व्हिटॅमिन सी चे स्रोत देखील आहे. बीटमध्ये मॅंगनीज, पोटॅशियम, लोह सारखे खनिजे असतात. याव्यतिरिक्त बीट हे बेटानिन, इनऑरगॅनिक नायट्रेट, व्हल्गॅक्सॅन्थिन सारख्या समृद्ध घटक देखील यात आहे. बीटचे हे संयुगे आणि खनिज-जीवनसत्त्वे तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत. चला तर मग जाणून घेऊयात की बीटच्या वापराने तुमची त्वचा कशी चमकदार होईल ते जाणून घेऊयात…
ओठांची पेग्मेंटेशन समस्या होईल कमी
तुम्हाला जर ओठांच्या पेग्मेंटेशनची समस्या असेल तर तुम्ही बीटचा रस नियमितपणे ओठांवर लावू शकता. दररोज झोपण्यापूर्वी बीटांचा रस ओठांवर लावा आणि सकाळी तुमचे ओठ स्वच्छ करा. बीटच्या रसात तुम्ही ग्लिसरीन किंवा नारळाचे तेल टाकून त्यांचा एक उत्तम लिप बाम तयार होईल, जो लावायलाही सोपा आहे. ज्यामुळे तुमचे ओठ मऊ होतील.
चेहऱ्यावर बीट कसे लावायचे?
बीट किसून घ्या आणि त्याचा रस काढा किंवा ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडी मुलतानी माती, चंदन पावडर टाका आणि फेस पॅक तयार करा. आता यात कोरफड जेल देखील मिक्स करा आणि गरज पडल्यास गुलाबपाण्याचा ही वापर करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा हा उपाय नियमितपणे करत रहा.
मुरुमांसाठी बीट पॅक
जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सच्या समस्या सतावत असतील तर ते कमी करण्यासाठी तुम्ही बीटाचा रस दही आणि मधात मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. हा पॅक 15-20 मिनिटे तसाच ठेवा आणि नंतर चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा. यामुळे पिंपल्स कमी होतील, डाग कमी होतील आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होईल.
या गोष्टी लक्षात ठेवा
अनेकांना असे वाटते की नैसर्गिक प्रत्येक गोष्ट चांगली असते, पण तसे नाही. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असू शकते, जी आधी आपल्याला माहित नसते. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर प्रथम पॅच टेस्ट करा आणि नंतर कोणताही पॅक किंवा मास्क लावा. जर तुम्हाला त्वचेवर खाज सुटत असेल किंवा जळजळ होत असेल तर फेस पॅक ताबडतोब काढून टाकावा. कोणत्याही उपायाचा किंवा प्रोडक्टचा फायदा एकाच वेळी मिळत नाही, त्यासाठी संयम आवश्यक आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
