Weight Loss | अशाप्रकारे करा अन्नाचे सेवन, झटक्यात कमी होईल वजन!

आपण जे काही करतो त्याचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो. सध्याच्या काळात बहुतेक लोक वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत.

Weight Loss | अशाप्रकारे करा अन्नाचे सेवन, झटक्यात कमी होईल वजन!
उन्हाळ्यात झपाट्याने कमी होईल आपले वजन, फक्त या 5 गोष्टी करा सेवन
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 12:49 PM

मुंबई : आपण जे काही करतो त्याचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो. सध्याच्या काळात बहुतेक लोक वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. अवाजवी वजन वाढण्यामागे हार्मोन्स, जेनेटिक्स, वातावरण आणि इतर अनेक कारणे असू शकतात. या व्यतिरिक्त आपला आहार, शारीरिक क्रियाकलाप आणि खाण्याच्या सवयी देखील यात महत्वाची भूमिका बजावतात (Eating Habits for weight loss and healthy body).

वजन कमी करण्यात आहाराची अर्थात अन्नाची प्रमुख भूमिका असते. आपण काय खातो, हेच नव्हे तर आपण हे कसे खातो याचा देखील आपल्या शरीरावर मोठा परिणाम होतो. आज आपण जाणून घेणार आहोत की, अन्न सेवन करण्याच्या पद्धतीचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो… चला तर, जाणून घेऊया खाण्याचा वेग आपले वजन कमी करण्यास कशाप्रकारे मदत करतो…

वजन कमी करण्यास ठरेल फायदेशीर!

बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, अन्न हळूहळू खाण्याची सवय ही आळशीपणाची मनोवृत्ती आहे. वास्तविक, अन्न हळूहळू खाण्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी आहारात घेतल्या जाणाऱ्या कॅलरीची विशेष काळजी घ्यावी. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हळूहळू खाण्यामुळे, आपले पोट बर्‍याच वेळासाठी भरलेले राहते. ज्यामुळे, खाण्यावर नियंत्रण येते आणि तुमचे वजन देखील वाढत नाही.

हळूहळू अन्न खाण्याचे फायदे

हळूहळू अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व पोषक घटक योग्य प्रकारे शोषले जातात. यामुळे, आपले पोट भरलेले राहते आणि आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागत नाही (Eating Habits for weight loss and healthy body).

स्ट्रेस पातळी कमी होते.

जितक्या जास्त वेळ अन्न तुम्ही चर्वण कराल तितक्या अधिक वेळ आपले मन आणि चित्त शांत राहील. यामुळे आपली तणाव पातळी कमी होईल. कमी तणावामुळे, आपल्याला कमी भूक देखील कमी लागते. परिणामी आपले वजन देखील कमी होते.

पाचन क्रिया सुधारते.

हळू हळू चावून अन्न खाल्ल्यामुळे,  त्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते. अधिक चर्वण करून अन्न खाणे, हे चांगल्या पाचन क्रियासाठीचे आणि वजन कमी करण्याचे महत्त्वाचे पाऊल आहे. याशिवाय हळूहळू खाण्याने तुम्ही अन्नाचा चांगलाच आनंद आणि स्वाद घेऊ शकाल. आपल्याला अन्नाची पूर्ण चव आहे, आनंद घेत खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Eating Habits for weight loss and healthy body)

हेही वाचा :

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात, मग आजच आहारामध्ये बडीशेपचा समावेश करा

आरोग्यासाठी बहुगुणकारी ‘कच्ची हळद’, जाणून घ्या याचे फायदे…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.