गुळ आणि तूप खा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 15, 2021 | 6:42 PM

गुळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गुळाच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे त्याला एक सुपर फूड देखील म्हटले जाते.

गुळ आणि तूप खा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !
गुळ आणि तूप
Follow us

मुंबई : गुळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गुळाच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे त्याला एक सुपर फूड देखील म्हटले जाते. गुळ आपल्या शरीरास डिटॉक्सिफाई करते. कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, जस्त, प्रथिने आणि व्हिटामिन बी यासारखे पौष्टिक घटक त्यात भरपूर प्रमाणात आढळतात. गुळात प्राकृतिक उष्णता असते, त्यामुळे आपले शरीर आतून उबदार राहते. (Eating jaggery and ghee boosts the immune system)

तूप डोकोसॅक्सिनोइक अॅसिडचा चांगला स्रोत आहे. डोकोसॅक्सिनोइक अॅसिड सर्वात लोकप्रिय ओमेगा-3 फॅटी अॅसिड आहे. ओमेगा 3 फॅटी अॅसिड ही आवश्यक चरबी आहेत, ज्याचे आपण आपल्या आहारात सेवन करणे आवश्यक आहे. हे अॅसिड आपले शरीर स्वतःहून तयार करू शकत नाही. डोकोसॅक्सिनोइक अॅसिडचा खास करून कर्करोग, हृदयविकाराचा झटका, मधुमेह, सांधेदुखीसारख्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, गुळ आणि तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

गूळ आणि तूप खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दररोज गुळ आणि तूप खाल्ले पाहिजे. हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. ज्या लोकांची हाडे कमजोर आहेत त्यांनी गुळ आणि तूप खाल्ले पाहिजे. तूपाचे असे बरेच महत्त्वपूर्ण फायदे आहेत. केसांच्या आरोग्यासाठी तूप अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. आपल्या स्काल्पला तुपाने मालिश केल्याने, ते आपल्या स्काल्पला नैसर्गिक ओलावा देते आणि केसांच्या मुळांना बळकट करते.

दूध आणि गुळ एकत्र करुन पिण्याचे देखील काही महत्वाचे फायदे आहेत.दुधात गूळ मिसळून पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. रोगप्रतिकारक शक्ति वाढवते, रक्त पुरवठा सुरळित होणे, थकवा दूर होतो, असे अनेक फायदे होतात. दुधात गुळ मिसळून पिल्यास रक्त स्वच्छ राहण्यास मदत होते.

रक्तामध्ये गाठी तयार होणे, रक्त पुरवठ्याचा त्रास होणे, अशा समस्या कमी होतात. पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि कफ टाळण्यासाठी याचा फायदा होतो. तुम्हाला जर मासिक पाळीचा त्रास होत असेल तर गुळ आणि दूध घ्या. गरोदर महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवल्यास दुधात गूळ मिसळून पिण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो.

संबंधित बातम्या : 

(Eating jaggery and ghee boosts the immune system)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI