AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात मिळणारी ही भाजी आहे खूपच गुणकारी, अनेक आजार होतात दूर

वाटाणा ही अतिशय पौष्टिक भाजी आहे. हे प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत देखील मानले जाते. यामध्ये असलेले कॅल्शियम, व्हिटॅमिन के आणि फॉस्फरस हाडे मजबूत करतात.

हिवाळ्यात मिळणारी ही भाजी आहे खूपच गुणकारी, अनेक आजार होतात दूर
| Edited By: | Updated on: Dec 15, 2024 | 9:02 PM
Share

हिवाळ्याच्या दिवसात अनेक ताजे फळभाज्या बाजारात येत असतात. या दिवसात हंगामी भाज्या खाणे आपल्या शरीरासाठी फायद्याचे ठरते. थंडीच्या दिवसात बाजारात हिरवेगार वाटाणे येतात. ही पौष्टिक भाजी जास्त करून हिवाळ्याच्या हंगामात येत असते. अश्यातच याला काही ठिकाणी मटार देखील बोलतात. अनेक गुणधर्मांची समृद्ध हा मटार आपल्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरून जेवणाची चव वाढवू शकतो. हिवाळ्यात मटार खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे मटार तुम्ही सोलून यातील दाणे साठवून फ्रिझरमध्ये ठेवल्यास तुम्ही यांचा वापर महिनाभर देखील करू शकता.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मटार प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, त्यात व्हिटॅमिन सी, के आणि बी 6, फायबर आणि लोह असते. भाजीपाला तयार करणे, पुलाव, बिर्याणी, सूप, कोशिंबीर आणि स्नॅक्स, पराठे आणि समोसे अश्या विविध पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. यामुळे भाज्या आणि इतर पदार्थांची चव आणखीनच चांगली होते.

मटार फायबरचा सर्वोत्तम स्त्रोत आहे

आयुर्वेदिक फिजिशियन यांच्यानुसार मटारमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात. याशिवाय मटारमध्ये कॅलरीज कमी असतात आणि पोट जास्त काळ भरलेले ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे वजन नियंत्रित राहते. या मटारमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम असते,याच्या सेवनाने हृदयरोगाचा धोका कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते. त्याचबरोबर यात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते.

वाटाणे हाडे मजबूत करण्यास उपयुक्त ठरतात

थंडीच्या दिवसात तुमच्या आहारात मटारचे समावेश नक्की करा. कारण मटारमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन के आणि फॉस्फरस देखील असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त मटारमध्ये ल्युटिन आणि झेक्सॅन्थिन सारखे पोषक असतात, जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आणि वृद्धत्वासह उद्भवणाऱ्या समस्या कमी करण्यास उपयुक्त असतात. जी लोक फक्त शाकाहारी आहार घेतात त्यांच्यासाठी वाटाणा हा प्रथिनांचा एक चांगला पर्याय आहे, जो स्नायू मजबूत करण्यास आणि दुरुस्तीस मदत करतो. त्याचबरोबर ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी मटारचे नियमित सेवन करा. मटारमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच मटारमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवतात आणि त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात आणि रक्ताची कमतरता दूर करण्यास देखील मदत करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?