डाळिंबाचे सेवन आरोग्यासाठी आवश्यक, शरीराला होतील अनेक फायदे!

डाळिंबाचे फळ दिसायला जितके सुंदर आहे, तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

डाळिंबाचे सेवन आरोग्यासाठी आवश्यक, शरीराला होतील अनेक फायदे!
डाळिंब
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 1:47 PM

मुंबई : डाळिंबाचे फळ दिसायला जितके सुंदर आहे, तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. डाळिंब खाण्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. याशिवाय टाईप-2 डायबिटीसशी लढण्यातही यामुळे बरीच मदत मिळते. डाळिंबामध्ये व्हिटामिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात आढळतात. यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर गुणधर्म देखील आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. (Eating pomegranate Essential for health)

डाळिंब संधिवातपासून देखील आपले संरक्षण करते. तसेच, पोटा संबंधित समस्यांमध्ये देखील डाळिंब फायदेशीर ठरते. जर दररोज डाळिंबचे सेवन केले तर आपण पोटाशी संबंधित समस्या टाळू शकता. चला तर मग जाणून घेऊया डाळिंब खाण्याचे अनेक फायदे…

-डाळिंब तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत करतो. डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडेंट उपस्थित असल्यामुळे ते फ्री रॅडिकल्सशी लढते. यासह, हे आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील कमी करते. डाळिंबामुळे रक्ताच्या गाठी तयार होण्यास प्रतिबंध होतो. या सर्वांमुळे, रक्त परिसंचरण सुधारते, ज्यामुळे शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्ताचा प्रवाह सुधारला जातो आणि ऑक्सिजनची पातळी वाढते.

-डाळिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत, जे आपल्या तोंडात प्लाक जमण्यापासून रोखतात. डाळिंबामुळे तोंडात संसर्ग आणि जळजळ होण्याचा धोकाही कमी होतो. डाळिंबाचा रस हिरड्याचे विकार आणि पीरियोडोंटायटिसपासून देखील आपला बचाव करतो.

-डाळिंबामुळे लठ्ठपणा नियंत्रित होतो, हे बर्‍याच अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. कारण डाळिंबात फायबर आणि कमी कॅलरीजयुक्त घटक असतात. हे खाल्ल्यानंतर आपल्याला भूक लागत नाही. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश नक्कीच करा.

-डाळिंब खाणे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंब खाल्ल्याने चेहऱ्यावरील तेज वाढते. चेहऱ्यावरील मुरूम, काळे डाग आणि चेहऱ्यावरील तेलकटपणा देखील डाळिंबामुळे कमी होतो. डाळिंबाचे साल आणि दूधाचे पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावल्यावर चेहऱ्यावर ग्लो येतो. साधारण आठ दिवसातून दोनदा आपण हे केले तर आपल्या त्वचेमध्ये बरेच बदल आपल्याला जाणवतील.

संबंधित बातम्या : 

(Eating pomegranate Essential for health)

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.