Weight loss : वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज सकाळी खा दोन बदाम

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण व्यायाम करण्यासाठी कुठे बाहेरही जाऊ शकत नाही.

Weight loss : वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज सकाळी खा दोन बदाम
बदाम
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 7:31 AM

मुंबई : सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण व्यायाम करण्यासाठी कुठे बाहेर जाऊ शकत नाही. त्यामध्येही अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. यामुळे वजन हे वाढतच चालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आरोग्याची विशेष काळजी घेत आपले वजन कमी करण्यावर भर दिला पाहिजे. कारण वाढलेले वजन हे अनेक आजारांना निमंत्रणच देत असते. आपल्या स्वयंपाक घरात असे काही घटक आहेत. ज्याचे सेवन करून आपण वाढलेले वजन कमी करू शकतो. (Eating two almonds every morning helps in weight loss)

प्रथिनेयुक्त बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते, जे आपल्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय राखण्यास मदत करते. यामुळे पोटाच्या आसपासची चरबी कमी होते. जर आपले वजन हे वाढतच चालेले असेल तर आपण आहारात बदामांचा समावेश करू शकतो. यामुळे आपल्याला शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होईल. दररोज सकाळी रिकाम्या पोटी जर आपण दोन बदाम खाल्ले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते.

बदाम पचविणे एवढे सोपे नाही. पण भिजवलेले बदाम सहज पचतात. याव्यतिरिक्त, हे एंजाइमचे उत्पादन वाढवते, जे पाचन तंदुरुस्त ठेवते. बदामामधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भूकेवर नियंत्रण आणतात. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. ‘व्हिटॅमिन ई’ अँटी-ऑक्सिडेंटच्या स्वरुपात कार्य करते. बदामामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन वाढत नाही. बदामांमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटामिन ई, कॅल्शियम, जस्त सारखे अनेक पौष्टिक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

बदामांमध्ये उच्च फायबर, असंतृप्त चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह, बदाम कमी ग्लायसेमिक निर्देशांक श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत, ज्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये ग्लूकोजचे प्रमाण बरेच कमी आहे.बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते, असे नेहमी म्हटले जाते. बदाम खाल्ल्याने फक्त स्मरणशक्तीलाच नाही तर शरीरालाही अजून अनेक फायदे होतात. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे स्मरणशक्ती द्रृढ करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्याच बरोबर बदाम नियमित खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Eating two almonds every morning helps in weight loss)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.