AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर लाइन्सकडून दिलं जात होस्टेसला इतकं आलिशान अपार्टमेंट; व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

प्रत्येक एअरलाईन आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा देत असते. पण अशी एक ही एअरलाईन आहे जी प्रवाशांचे तर शाही आदरातिथ्य करतेच पण त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी देखील खास सुविधा देते. या एअरलाईनच्या एका केबिन क्रूने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओच्या माध्यमातून कंपनीने तिला दिलेल्या लक्झरीअस सुविधांची झलक दाखवली आहे.

एअर लाइन्सकडून दिलं जात होस्टेसला इतकं आलिशान अपार्टमेंट; व्हिडिओ पाहून थक्क व्हाल
Etihad Airways Cabin Crew Luxury Apartments, 3BHK Abode in Abu DhabiImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2025 | 5:37 PM
Share

एअर होस्टेससंबंधीत अनेक गोष्टी अनेकदा पाहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील. त्यांची लाईफस्टाईल ही नेमकी कशी असते हे जाणून घेण्यात सर्वांनाच उत्सुकता असते. एअरहोस्टेस आणि फ्लाइट अटेंडंट्सची कामे काय असतात, किंवा त्यांना कामाबाबत कोणते नियम लागू केलेले असतात याबद्दल जाणून घेण्याची आतुरता असते. पण खरंतर एअरहोस्टेस आणि फ्लाइट अटेंडंट्सचा प्रवास केवळ लग्झरीअस, ग्लॅमरस नसतो तर तेवढा रंजकही असतो. याबद्दल एका एअर हॉस्टेसने स्वत: खुलासा केला आहे.

एतिहाद एअरवेजच्या केबिन क्रू सोनिया पाल यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये याबद्दल सांगितलं आहे. त्यांनी अबू धाबीमध्ये उपलब्ध असलेल्या 3BHK अपार्टमेंटची झलक दाखवली. त्यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 केबिन क्रू इंस्टाग्रामवर शेअर केलेला तो आलिशान घराचा व्हिडिओ

भारतीय क्रू मेंबर सोनिया पाल यांनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि त्या व्हिडीओला कॅप्शन लिहिलं आहे, ‘एतिहाद केबिन क्रूची राहण्याची जागा’, व्हिडिओमध्ये तिने तिच्या घराची संपूर्ण झलक दाखवली.

आलिशान 3 बीएचके अपार्टमेंट

व्हिडिओची सुरुवात मॉडर्न स्टाइलने सजवलेल्या लिविंग रूमने होते. यानंतर सोनिया स्वयंपाकघर दाखवते, जे सर्व आवश्यक उपकरणांनी सुसज्ज असलेले दिसत आहे. मग तिने व्हिडीओमध्ये तिची आरामदायी बेडरूमही दाखवली. त्या बेडरूममधून बाहेरील दृश्य सुंदर अन् एखाद्या स्वप्नासारखे दिसत आहे.

बेडरूममधून दिसणारे शहराचे विहंगम दृश्य

एवढंच नाही तर सोनियाने सांगितले की तिच्या अपार्टमेंटमध्ये एक स्वतंत्र कपडे धुण्याची खोली म्हणजे लॉन्ड्री रुम आहे. ज्यामुळे तिला कामाता ताण कमी पडतो. पण सर्वात खास गोष्ट म्हणजे तिच्या बेडरूममधून दिसणारे शहराचे विहंगम दृश्य, जे पाहून ती स्वतः म्हणते “मला ही रुम खूप आवडते, हे घर माझ्या अपेक्षेपेक्षा खूप सुंदर आहे.”

हा व्हिडिओ 25 ऑगस्ट 2025 रोजी शेअर करण्यात आला होता आणि आतापर्यंत त्याला 84,000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोक कमेंटमध्ये घराचे आणि सोनियाचे कौतुक करत आहेत.

Sonia Pal Instagram

View this post on Instagram

A post shared by Sonia pal (@sonia_pal_15)

मॉडर्न एयरक्राफ्ट, लक्झरी सेवा अन्  प्रवाशांचं उत्कृष्ट आदरातिथ्य

एतिहाद एअरवेज ही संयुक्त अरब अमिरातमधील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी आहे. ज्याचे मुख्यालय अबू धाबी येथे आहे. 2003 मध्ये सुरू झालेली ही विमान कंपनीचे विमान आज 50 हून अधिक देशांमध्ये उड्डाणे घेतात. तसेच मॉडर्न एयरक्राफ्ट, लक्झरी सेवा आणि उत्कृष्ट आदरातिथ्यासाठी, विमानात प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा यासाठी ही कंपनी खास करून ओळखली जाते.

तसेच केबिन क्रू सोनिया पाल यांनी दाखवलेल्या त्यांच्या या लक्झरी अपार्टमेंटमुळे ही विमान कंपनी फक्त प्रवाशांच्याच सुविधांचा विचार करत नाही तर त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीही तेवढ्याच खास सुविधा उपलब्ध करून देते हे दिसून येते.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.