AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रायल रुममध्येच कपडे भारी का वाटतात? घरी आल्यावर लूक का बदलतो? कधी विचार केलाय?

ट्रायल रूममध्ये खरेदी केलेले कपडे घरी आल्यावर वेगळे का दिसतात? मॉलमध्ये वापरले जाणारे विशिष्ट प्रकाशयोजना, झुकलेले किंवा स्लिमिंग आरसे आणि स्वच्छ, वातानुकूलित वातावरण यामुळे कपडे अधिक आकर्षक वाटतात. घरी नैसर्गिक किंवा वेगळ्या प्रकाशात तेच कपडे पाहिल्यावर त्यांची खरी बाजू समोर येते.

ट्रायल रुममध्येच कपडे भारी का वाटतात? घरी आल्यावर लूक का बदलतो? कधी विचार केलाय?
Trial Rooms Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 12, 2026 | 7:29 PM
Share

बऱ्याचदा आपण मॉलमध्ये शॉपिंग करतो. नवीन कपडे खरेदी करतो. कपडे व्यवस्थित येण्यासाठी आपण ट्रायल रुममध्ये जाऊन कपडे घालूनही बघतो. कपडे परफेक्ट येतात का? आपल्याला सूट होतात का? आपल्या अंगावर भारी वाटतात का? हे आपण पाहतो. ट्रायल रुममध्ये कपडे घातल्यावर आपल्याला ते भारी वाटतात. सूटही होतात. त्यामुळे आपण त्या कपड्यांच्या प्रेमातच पडतो. अशावेळी आपण कपड्यांची किंमत पाहत नाही. लगेच हे कपडे खरेदी करतो आणि घरी घेऊन येतो. पण घरी आल्यावर जेव्हा आपण घरच्यांना दाखवण्यासाठी कपडे घालून बघतो. तेव्हा आपला चेहरा पडतो. कारण घरी आल्याबरोबर कपडा बरोबर नाही, कलर चांगला नाही, आपल्याला सूट होत नसल्याचं आपल्या लक्षात येतं. आपली फसवणूक झाल्याचं शल्य मनाला लागतं. कधी कधी तर आपण आणलेले कपडेही वापरत नाही. मॉलच्या ट्रायल रुममध्ये चांगले वाटणारे कपडे घरी आल्याबरोबर आवडू का लागत नाही? नेमकं असं का होतं? चला तर जाणून घेऊया.

ट्रायल रूममध्ये कपडे चांगले दिसण्याची कारणे —

1. लाईटिंगचा खरा खेळ :

मॉलमधील ट्रायल रूममध्ये तुम्ही लक्ष दिलं असेल, तर तिथे सामान्यतः वॉर्म लाईटिंग वापरली जाते. या लाईट्स वरून न येता बाजूंनी किंवा आरशाच्या मागून येतात. याचा फायदा असा होतो की चेहरा आणि शरीरावर पडणाऱ्या सावल्या (Shadows) कमी दिसतात. यामुळे त्वचा अधिक ग्लोइंग दिसते आणि कपड्यांचा रंग अधिक आकर्षक व लक्झरी वाटतो. पण घरी आपण तोच ड्रेस साध्या ट्यूबलाइट किंवा पांढऱ्या प्रकाशात घातला, की त्याचं खरं रूप दिसतं.

2. आरशांची खास सेटिंग :

मॉल आणि स्टोअर्समध्ये वापरले जाणारे आरसे हे साधे आरसे नसतात. अनेकदा ते थोडेसे टिल्ट (झुकवून) लावलेले असतात. आरसा खालीपासून थोडा बाहेरच्या बाजूला झुकलेला असेल, तर तुमची उंची अधिक वाटते आणि तुम्ही सडपातळ दिसता. याशिवाय, आजकाल अनेक ब्रँड्स स्लिमिंग मिरर्स वापरतात, जे तुम्हाला प्रत्यक्षापेक्षा 5 ते 10 टक्के अधिक फिट दाखवतात. जेव्हा आपण स्वतःला इतकं स्मार्ट पाहतो, तेव्हा आपला मेंदू लगेच ते कपडे खरेदी करण्याचा संकेत देतो.

3. स्वच्छता आणि वातावरण :

ट्रायल रूम नेहमी खूप स्वच्छ आणि सुगंधी ठेवले जातात. तिथलं तापमानही अगदी परफेक्ट (एसीची थंड हवा) असतं. बाहेरच्या उकाड्या आणि गोंगाटातून येऊन जेव्हा आपण त्या शांत, थंड वातावरणात एका उत्कृष्ट आरशासमोर स्वतःला पाहतो, तेव्हा आपला फील-गुड फॅक्टर वाढतो. अशा मानसिक स्थितीत साधे कपडेही आपल्याला खूप छान वाटू लागतात.

Follow Us
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!
उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कोणतंही कारण न सांगता जिल्हाप्रमुखाने थेट...
Big Breaking | उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कोणतंही कारण न सांगता जिल्हाप्रमुखाने थेट....कोल्हापुरात नेमकं काय घडलं?
भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण...
भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण...
ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय पाटलांना आव्हाडांचा थेट इशारा
Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान