Winter Fashion | यंदाचा हिवाळा हटके आणि स्टाईलिश, टोपीपासून बूटसचे ट्रेडींग पर्याय

तुम्हाला थंडीपासून बचाव करण्यासोबतच स्टाईलिश दिसायचे असेल, तर तुम्ही पुढील काही पर्याय नक्की विचार करु शकता. (Winter Trending Fashion Style)

Winter Fashion | यंदाचा हिवाळा हटके आणि स्टाईलिश, टोपीपासून बूटसचे ट्रेडींग पर्याय
Namrata Patil

|

Dec 07, 2020 | 2:00 PM

मुंबई : थंडीच्या मोसमात फॅशन आणि ड्रेसिंग स्टाईल पूर्णपणे बदलतो. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण स्वेटर, शाल, मफलर याचा वापर करतो. पण थंडीचा सामना करताना स्टाईल किंवा हटके राहणे थोडं कठीण होतं. अनेकदा स्वेटरमुळे आपण परिधान केलेल्या कपड्यांचा लूकच नाहीसा होतो. त्यामुळे जर यंदाच्या हिवाळ्यात तुम्हाला थंडीपासून बचाव करण्यासोबतच स्टाईलिश दिसायचे असेल, तर तुम्ही पुढील काही पर्याय नक्की विचार करु शकता. (Winter Trending Fashion Style)

थंडीपासून बचावासाठी टोपी

थंडीपासून बचावासाठी लहान मुलं सर्रास टोपीचा वापर करतात. पण तुम्हीही हिवाळ्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राप्रमाणे टोपी घालू शकता. त्यामुळे तुम्हाला स्टाईलिश लूकही मिळतो.

स्वेटर ड्रेस

यंदा हिवाळ्यात तुम्ही स्वेटर ड्रेसही ट्राय करु शकता. जर तुम्हाला ट्रेंडीग लूक हवा असेल, तर तुम्ही या स्वेटर ड्रेससोबत बूट्स, जॅकेट वापरु शकता.

क्रॉप स्वेटर

जर तुम्ही क्रॉप टॉप घालण्याचे शौकीन असाल तर तुम्ही क्रॉप टॉपऐवजी क्रॉप स्वेटर घालू शकता. या क्रॉप स्वेटरसोबत हाय वेस्ट जिन्स आणि हिल्स घातल्याने तुम्ही फारच सुंदर दिसाल. (Winter Trending Fashion Style)

आऊटफिटसोबत मॅचिंग जॅकेट

कोणत्याही आऊटफिटवर त्याच रंगाचे मॅचिंग जॅकेट घातल्याने त्या पोषाखाला वेगळाच लूक मिळतो. प्रियांका चोप्राने लाल रंगाच्या ड्रेसवर त्याच रंगाचा जॅकेट घातला आहे. त्यामुळे तिच्या आऊटफिटला वेगळाच लूक मिळाला आहे. विशेष म्हणजे तुम्ही एखाद्या साडीवरही त्याच्या मॅचिंगप्रमाणे जॅकेट वापरु शकता.

बूटस

थंडीच्या काळात बूट्स हा फार चांगला पर्याय असतो. यामुळे थंडीपासून संरक्षण तर होतं, त्याशिवाय वेगळा स्टाईलिश लूकही मिळतो. जिन्स, स्कर्ट, ड्रेस यासारख्या कोणत्याही आऊटफिटवर तुम्ही बूटस वापरु शकता.

ओवरसाईज कोट

यंदा हिवाळ्यात तुम्ही ओव्हरसाईज कोटचाही वापर करु शकता. या ओव्हरसाईज कोटसोबत तुम्ही प्रिंटेड जिन्स जर ट्राय केली तर एक हटके पर्याय मिळतो. (Winter Trending Fashion Style)

संबंधित बातम्या : 

रोजच्या जीन्सला ट्रेंडी लूक देण्याचे 10 फंडे

डेनिमच्या कपड्यांना तरुणांची पसंती का?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें