VIDEO : भांडी घासण्याचा कंटाळा येतोय? मग हा सिक्रेट जुगाड करा, एका मिनिटात भांडी होतील चकाचक
या लेखात एक व्हायरल झालेला किचन हॅक सांगितला आहे ज्यामुळे भांडी घासण्याचे काम खूपच सोपे आणि वेगवान होते. एका स्क्रबरचा वापर करून एक विशेष प्रकारचे हातमोजे बनवून भांडी सहजपणे आणि जलद स्वच्छ करता येतात.

आपल्यापैकी अनेकांना भांडी घासण्याचा कंटाळा येतो. भांडी घासणे म्हणजे अनेकांसाठी कंटाळवाणं आणि वेळखाऊ काम असते. काही लोक भांडी घासण्यासाठी मोलकरीण ठेवतात. तर काही गृहिणी भांडी घासणं टाळता यावं यासाठी अनेक युक्त्या शोधत असतात. प्रत्येकाला भांडी घासणं हे काम लवकर कसं संपेल याची चिंता असते. पण आता इंटरनेटवर एक असा किचन हॅक (Kitchen Hack) व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचं भांडी घासण्याचं काम अक्षरशः चुटकीसरशी पूर्ण होईल.
सध्या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. नुकतंच इन्स्टाग्रामवर @vikspire नावाच्या हँडलने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या ट्रेडींगमध्ये आहे. या व्हिडीओला 1.96 कोटींहून अधिक व्ह्यूज आणि 2.99 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या हॅकमुळे तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने भांडी घासता येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला लागणारा वेळही कमी होणार आहे.
भन्नाट हॅक नक्की काय?
या व्हिडीओच्या सुरुवातीला एक महिला भांडी धुण्यासाठी वापरला जाणारा नेहमीचा स्क्रबर घेतो. त्यानंतर या स्क्रबरवरील हिरवा, खरखरीत थर कापतो आणि त्याचे पाच छोटे तुकडे करतो. हे तुकडे तो आपल्या हाताच्या बोटांना नीट बसतील अशाप्रकारे कापतो. त्यानंतर उरलेला स्क्रबरचा मऊ भाग हाताच्या तळव्याच्या आकाराएवढा कापतो.
यानंतर ती महिला एक ग्लोव्ह घेते. त्यानंतर ती त्या ग्लोव्हवर हिरव्या रंगाच्या कापलेल्या स्क्रबरचे तुकडे पाचही बोटांच्या ठिकाणी चिकटवते. त्यानंतर स्क्रबरचा तळव्याच्या आकाराएवढा कापलेला मऊ भाग ती हातमोज्याच्या मध्यभागी, तळहाताच्या ठिकाणी व्यवस्थित चिकवटते. अशारितीने तुमचे ग्लोव्ह स्क्रबर तयार होतील.
View this post on Instagram
स्वयंपाकघरातील काम नक्की सुपरफास्ट होईल…
हे हातमोजे घातल्यावर तुम्हाला भांडी घासणं सोपं होईल. तसेच भांडी घासण्याची प्रक्रिया अत्यंत वेगवान होईल. एरवी आपण एका हातात स्क्रबर घेऊन भांडी घासतो. ज्यात जास्त वेळ लागतो. पण या हॅकमुळे भांड्यांची स्वच्छता करणं सोपं होणार आहे. हा हॅक इतका सोपा आहे की, तुमचे भांडी घासण्याचे काम फक्त काही मिनिटात होईल आणि तुमचा बराच वेळ वाचेल. तुम्हीही हा हॅक नक्की ट्राय करून बघा. यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातील काम नक्की सुपरफास्ट होईल.
