AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही पहिल्यांदाच चेहऱ्यावरील नको असलेले केस काढत आहात का? तर लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी

आजकाल महिला चेहऱ्यावरील नको असलेले केस काढतात. तर त्वचेवर नको असलेले केस काढण्यासाठी काही महिला या पार्लरमध्ये जाणून काढतात तर काहीजणी या घरीच फेशियल रेझरचा वापर करतात. जर तुम्ही पहिल्यांदाच चेहऱ्यावरील केस काढणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ज्या आम्ही या लेखात सांगत आहोत.

तुम्ही पहिल्यांदाच चेहऱ्यावरील नको असलेले केस काढत आहात का? तर लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी
First-time facial hair removal, important tips for womenImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 8:43 PM
Share

चेह-यांचे सौंदर्य आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचे असते. यामध्ये त्वचेच्या समस्या पुरळ, मुरूम यांबरोबर आणखीन एक समस्या असते ती म्हणजे त्वचेवर नको असणारे केस. अनेक महिला हे त्वचेवरील केस काढण्यासाठी घरी रेझर आणि फेशियल वॅक्स वापरत असतात. परंतु चेहऱ्यावरील केस स्वतः काढण्यासाठी सावधगिरी बाळगणे आणि योग्य पद्धतीने ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया पहिल्यांदाच करणार असाल तेव्हा योग्य पद्धत अवलंबणे खूप महत्वाचे होते, अन्यथा त्वचेवर पुरळ, जळजळ किंवा मुरुम यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जर तुम्ही पहिल्यांदाच चेहऱ्यावरील नको असलेले केस काढणार असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून तुमची त्वचा खराब होऊ नये आणि तुम्हाला गुळगुळीत आणि स्वच्छ त्वचा मिळू शकेल. तर या लेखात त्या खास गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्या तुम्ही चेहऱ्यावरील केस काढण्यापूर्वी आणि नंतर पाळल्या पाहिजेत.

प्रथम तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घ्या

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते काहींची तेलकट असते तर काहींची कोरडी असते, तर काही संवेदनशील असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यापूर्वी, तुमच्या त्वचेचा प्रकार काय आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. संवेदनशील त्वचेवर रेझर किंवा वॅक्सिंगचा चुकीचा वापर केल्याने जळजळ किंवा ॲलर्जी होऊ शकते.

त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा

चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यापूर्वी सौम्य फेसवॉशने चेहरा पूर्णपणे धुवा. त्वचेतील तेल आणि घाण काढून टाकणे महत्वाचे आहे जेणेकरून रेझर किंवा वॅक्सिंग करताना छिद्रे बंद होणार नाहीत आणि संसर्गाचा धोका राहणार नाही. यासोबतच चेहरा धुतल्यानंतर जेल किंवा मॉइश्चरायझर लावा.

रेझर वापरत असाल तर स्वच्छतेची काळजी घ्या

तुम्ही रेझर वापरत असलात किंवा एपिलेटर वापरत असलात तरी, ते नवीन आणि स्वच्छ असल्याची खात्री करा. गंजलेल्या किंवा जुन्या ब्लेडमुळे कट आणि त्वचेचे संक्रमण होऊ शकते. जर तुम्ही वॉक्स वापरत असाल तर ते किती गरम आहे त्वचेवर सहन होईल का हे तपासा.

चेहऱ्यावरील केस काढल्यानंतर मॉइश्चरायझर लावा

चेहऱ्यावरील केस काढल्यानंतर लगेचच त्वचेवर हलके आणि सुगंध नसलेले मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा थंड होईल आणि जळजळ होणार नाही. तसेच त्वचेला आराम मिळेल. केस काढल्यानंतर लगेच मेकअप करू नका, किमान6-8 तासांचा अंतर ठेवा.

उन्हापासून स्वतःचे रक्षण करा

चेह-यावरील नको असलेले केस काढल्यानंतर, काही काळ उन्हात बाहेर जाणे टाळा किंवा सनस्क्रीन वापरा. ​​कारण त्वचा संवेदनशील होते आणि उन्हात लवकर बर्न होऊ शकते. तसेच, चेहऱ्यावरील केस जास्त वेळा काढू नका. आठवडाभर किंवा वारंवार केस काढल्याने त्वचा पातळ होऊ शकते. म्हणून, चेहऱ्यावरील केस काढताना 15-20 दिवसांचे अंतर ठेवणे चांगले.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.