दक्षिण भारतीयांप्रमाणे तुम्हीही उकडलेल्या शेंगदाण्यांचे सेवन करताय? मग तुम्हाला मिळतील 5 आरोग्यदायी फायदे
दक्षिण भारतीयांच्या आहारात व नाश्त्यात उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगांचा समावेश अधिक असतो, कारण उकडलेले शेंगदाणे त्यांच्या आहारात स्मार्ट स्नॅक मानले जातात . याच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे शरीराला होत असतात. चला तर मग आजच्या लेखात आपण उकडलेल्या शेंगदाण्याचे फायदे जाणून घेऊयात...

तुम्ही जर कधी दक्षिण भारतात विशेषत: तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशात फिरायला गेलात तर तुम्ही तेथे नक्की पहा की तेथे तुम्हाला भुईमुगाच्या शेंगा जास्त करून पाहायला मिळतील, कारण दक्षिण भारतीय लोकं त्यांच्या आहारात आणि नाश्त्यात उकडलेल्या शेंगदाण्याचे सेवन करतात आणि हे अधिक फायदेशीर देखील असते. तर ही पद्धत तिथे सामान्य आहे. या मागच कारण म्हणजे तेथील लोकं भाजलेले किंवा कच्चे शेंगदाणे आरोग्यासाठी फायदे प्रदान करण्याऐवजी अनेक आरोग्य समस्या निर्माण करतात असे मानतात. म्हणून उकडलेले शेंगदाणे सर्वात जास्त आरोग्यदायी आहे असे मानतात आणि त्याचे सेवन करतात. अशातच आहारतज्ञांच्या मते ही उकडलेले शेंगदाणे कच्च्या किंवा भाजलेल्या शेंगदाण्यापेक्षा खूपच फायदेशीर आहेत. चला तर आपण आजच्या लेखात उकडलेल्या शेंगदाण्याचे पाच प्रमुख फायदे जाणून घेऊयात.
उकडलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
हृदयासाठी फायदेशीर
हेल्थलाइनच्या मते उकडलेल्या शेंगदाण्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढविण्यास मदत करतात. दक्षिण भारतातील लोक बहुतेकदा शेंगदाणे भाजून खाण्याऐवजी ते उकडवून खातात, ज्यामुळे शेंगदाण्यामधील फॅटचे प्रमाण कमी होते आणि त्यांचे पौष्टिक मूल्य टिकून राहते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
प्रथिनांचा एक उत्तम स्रोत
जी लोकं मांसाहारी पदार्थ सेवन करत नाहीत त्यांच्यासाठी उकडलेले शेंगदाणे हे प्रथिनांचा एक स्वस्त आणि नैसर्गिक स्रोत आहे. 100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये अंदाजे 25 ग्रॅम प्रथिने असतात. दक्षिण भारतीय आहारात, शरीराला दिवसभर पुरेशी ऊर्जा मिळावी म्हणून शेंगदाणे बहुतेकदा इडली, उपमा किंवा पोह्यासोबत खाल्ले जातात. शेंगदाणे उकडवून खाल्याने प्रथिने पचण्यास सोपे होतात.
वजन कमी करण्यास उपयुक्त
अनेकांना असे वाटते की शेंगदाणे खाल्ल्याने वजन वाढते, मात्र उकडलेल्या शेंगदाण्यांमध्ये फायबर आणि प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले राहण्यास मदत होते आणि भूक कमी होते. म्हणूनच दक्षिण भारतीयांना ते ऑफिस ब्रेक किंवा प्रवासाच्या नाश्त्या सेवन करायला आवडतात. जर तुम्ही जंक फूड टाळण्यासाठी निरोगी नाश्ता शोधत असाल तर उकडलेले शेंगदाणे हा एक उत्तम पर्याय आहे.
मेंदूला चालना देणारे आणि मूड उंचावणारे
शेंगदाणे नियासिन, फोलेट, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. हे संयुगे मेंदूच्या पेशी सक्रिय ठेवतात आणि नैराश्य आणि थकवा यासारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत करतात. दक्षिण भारतातील विद्यार्थी आणि काम करणारे लोक त्यांचे मन ताजेतवाने करण्यासाठी आणि ऊर्जा राखण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्याज उकडलेल्या शेंगदाण्याचे सेवन करत असतात.
मधुमेह आणि कर्करोग रोखते
उकडलेल्या शेंगदाण्यामध्ये पॉलीफेनॉल आणि रेझवेराट्रोल असते, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच यांच्या सेवनाने शरीरात मुक्त रॅडिकल्स तयार होण्यापासून देखील रोखतात, ज्यामुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो. हा गुप्त असलेला दक्षिण भारतीय आरोग्य उपाय हळूहळू संपूर्ण भारतात लोकप्रिय होत आहे.
उकडलेले शेंगदाणे कसे खावेत?
शेंगदाणे 20 मिनिटे मीठ पाण्यात उकडवून घ्या. तुम्ही ते प्रेशर कुक मध्ये देखील उकडवून घेऊ शकता. त्यात थोडासा लिंबाचा रस, कांदा आणि हिरव्या मिरच्या मिक्स करून चाट सारख बनवू खाऊ शकता. हा आरोग्यदायी नाश्ता केवळ चविष्टच नाही तर पौष्टिक देखील आहे. उकडलेले शेंगदाणे दक्षिण भारतीय आहारात “स्मार्ट स्नॅक” मानले जातात कारण ते पोट भरणारे, ऊर्जा देणारे आणि आरोग्यदायी असतात. जर तुम्हाला निरोगी खाणे सुरू करायचे असेल, तर आजच तुमच्या स्नॅक मेनूमध्ये उकडलेले शेंगदाणे समाविष्ट करण्याचा विचार करा. त्यात असलेले प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीराला ऊर्जा देतील आणि आजारांपासून तुमचे रक्षण करतील.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
