
बदलत्या ऋतूमुळे चेहऱ्यावर मुरूमे, पुरळ अशा समस्या निर्माण होत असतात. त्यात मुरुमे ही एक सामान्य त्वचेची समस्या आहे, जी बहुतेकदा किशोरवयीन आणि तरुणांना होते. त्याचबरोबर चुकीच्या खाण्याच्या सवयी, ताणतणाव, हार्मोनल असंतुलन आणि योग्य त्वचेची काळजी न घेतल्यामुळे अनेकांना मुरुमांची समस्या उद्भवू शकते. त्यापासून मुक्त होण्याचा स्वस्त आणि प्रभावी उपाय कडुलिंबाच्या पानांमध्ये लपलेला आहे.
मुरुम बरे करण्यासाठी कडुलिंब हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचा स्वच्छ करण्यास आणि मुरुम कमी करण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला कडुलिंबापासून बनवलेल्या 5 फेस पॅकबद्दल सांगणार आहोत, जे मुरुम कमी करण्यास आणि त्वचा निरोगी बनविण्यास मदत करतील.
हा फेसपॅक बनवण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा कडुलिंब पावडर मिक्स करा आणि गुलाब पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर चांगली लावा आणि 15-20 मिनिटे सुकू द्या, नंतर थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट लावताना, ती डोळ्यांजवळ जाणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा त्यामुळे तीव्र जळजळ होईल. हा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील मुरुमे कमी होतील आणि मुरुमांमुळे होणारी सूज आणि लालसरपणा देखील दूर होईल.
एक चमचा कडुलिंब पावडर आणि एक चमचा मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिक्स करून पेस्ट बनवा. पेस्ट थोडी घट्ट करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर समान रीतीने लावा. 15-20 मिनिटांनी सुकल्यानंतर, पाण्याने धुवा. या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होईल आणि त्वचा डिटॉक्स होईल.
एक चमचा कडुलिंब पावडर आणि एक चमचा मध मिक्स करून पेस्ट बनवा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. या फेस पॅकमुळे मुरुमे कमी होतीलच, शिवाय त्वचेला मॉइश्चरायझेशन देखील मिळेल .
हा फेसपॅक बनवण्यासाठी, एक चमचा कडुलिंब पावडर घ्या आणि त्यात एक चमचा कोरफड जेल मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी पाण्याने धुवा. हा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील घाण साफ होईल आणि त्वचा थंड होईल.
एक चमचा कडुलिंब पावडर आणि एक चमचा दही यांची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. हा फेस पॅक चेहऱ्यावरील मृत पेशी साफ करतो, मुरुमे कमी करतो आणि त्वचा चमकदार बनवतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)