AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचेवर अशा पद्धतीने लावा चंदन पावडर, चेहऱ्यावरील अनेक समस्या होतील दूर

चंदन त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि थंड गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा मऊ, चमकदार आणि डागरहित बनते. चंदन पावडरचा वापर अनेक प्रकारे करता येतो, जो त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतो चला जाणून घेऊया त्वचेसाठी चंदन कसे वापरावे?

त्वचेवर अशा पद्धतीने लावा चंदन पावडर, चेहऱ्यावरील अनेक समस्या होतील दूर
sandalwood face pack
| Edited By: | Updated on: Jun 28, 2025 | 1:11 AM
Share

आपल्या सर्वांनाच माहित आहे की चंदनाचा वापर शतकानुशतके त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी आणि थंडावा देणाऱ्या गुणधर्मांसाठी केला जात आहे. तसेच चंदन त्वचेसाठी विशेषतः फायदेशीर आहे, कारण त्यात दाहक-विरोधी, जीवाणूविरोधी आणि थंडावा देणारे गुणधर्म आहेत. म्हणूनच त्वचेवर चंदन पावडरचा वापर केल्यास त्वचा मऊ, चमकदार आणि डागरहित होते. तर तुम्हाला ही तुमची त्वचा चमकदार हवी असेल तर आजच्या या लेखात आपण चंदनापासून बनवलेले 5 सर्वोत्तम फेस पॅक आणि त्यांचे फायदे याबद्दल जाणून घेऊयात…

चंदन आणि गुलाब पाण्याचा फेस पॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा चंदन पावडर आणि दोन चमचे गुलाबजल मिक्स करा आणि याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटे पॅक सुकू द्या, नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक त्वचेला थंडावा देतो. यामुळे चेहऱ्याची चमक वाढते आणि मुरुमे आणि डाग कमी होण्यासही खूप मदत होते .

चंदन आणि हळदीचा फेस पॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा दूध असे मिश्रण मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. आता तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा. हा फेसपॅक लावल्याने त्वचेची चमक वाढते. पिंपल्स आणि मुरुमे कमी होतात आणि त्वचेचे संक्रमण देखील टाळता येते.

चंदन आणि दह्याचा फेस पॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा दही मिक्स करून पेस्ट बनवा. तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते. त्वचेवरील तेल नियंत्रित होते आणि त्याचबरोबर त्वचेतील मृत पेशी देखील स्वच्छ होतात.

चंदन आणि मधाचा फेस पॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी, एक चमचा चंदन पावडर आणि अर्धा चमचा मध एकत्र मिक्स करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा. हा फेसपॅक लावल्याने त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळते. त्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा घट्ट होते.

चंदन आणि लिंबू फेस पॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी, एक चमचा चंदन पावडर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे त्वचेवरील डाग हलके होतात. त्वचेवरील तेल नियंत्रित होते आणि चेहरा उजळ दिसतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत