Black Fungus : ब्लॅक फंगसला प्रतिबंध करण्यासाठी फोलो करा या 3 सोप्या टिप्स

संक्रमणाच्या इतर लक्षणांमध्ये चोंदलेले नाक, तीव्र वेदना, चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यांखाली जळजळ होणे, अस्वस्थता, ताप आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. (Follow these three simple tips to prevent black fungus)

Black Fungus : ब्लॅक फंगसला प्रतिबंध करण्यासाठी फोलो करा या 3 सोप्या टिप्स
नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

May 22, 2021 | 7:20 AM

मुंबई : कोविड रिकव्हरीनंतर काळ्या बुरशी(Black Fungus)चे वेगाने संक्रमण होत आहे. त्याला म्युकोर मायकोसिस देखील म्हणतात. जे नुकतेच कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत त्या रुग्णांमध्ये म्युकोर मायसोसिस आढळत आहे. जे अधिक काळ ऑक्सिजनवर अवलंबून आहेत किंवा ज्यांची शुगर लेवल वाढली, असे लोकांमध्ये म्युकोर मायकोसिस आढळत आहे. हे ऑक्सिजन मास्कसारख्या गंभीर उपकरणाच्या खराब स्वच्छतेमुळे देखील होऊ शकते. तथापि, काही सुलभ ओरल हायजीन टिप्स फॉलो करुन डेंटिस्टच्या सल्ल्यानुसार हा दुर्मिळ परंतु जीवघेणा रोग होण्याची शक्यता कमी होऊ शकते. कारण प्राथमिक काळ्या बुरशीच्या लक्षणांमध्ये ओरल टिश्यूज, जीभ आणि हिरड्यांचे रंगद्रव्य समाविष्ट आहे. संक्रमणाच्या इतर लक्षणांमध्ये चोंदलेले नाक, तीव्र वेदना, चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यांखाली जळजळ होणे, अस्वस्थता, ताप आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. (Follow these three simple tips to prevent black fungus)

तोंडाची स्वच्छता राखणे

कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर स्टिरॉइड्स आणि इतर औषधांचे सेवन केल्याने बॅक्टेरिया आणि बुरशीची तोंडात वाढ होते. यामुळे सायनस, फुफ्फुसात आणि मेंदूमध्येही समस्या उद्भवतात. दिवसातून कमीत कमी दोन किंवा तीन वेळा ब्रश करुन तोंडाची काळजी घेतल्यामुळे आपल्याला बॅक्टेरिया नियंत्रित करत येऊ शकतात. तोंडाची स्वच्छता करणे देखील खूप उपयुक्त असल्याचा सल्ला दिला जातो.

ओरल रायजिंग

कोविड-19 पासून बरे झाल्यानंतर या रोगाच्या दुष्परिणामांपासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी तोंडाचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. जुन्या ब्रशवरील विषाणू पुन्हा हल्ला करू नये म्हणून रूग्णांना निगेटिव्ह चाचणी आल्यावर टूथब्रश बदलण्याचा सल्ला देण्यात येतो. काळ्या बुरशीसह कोणत्याही प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी आपले तोंड नियमितपणे धुण्याचा सल्ला दिला जातो.

टूथब्रश आणि टंग क्लीनर निर्जंतुक करा

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोविड संक्रमित रूग्ण किंवा त्यातून बरे झालेल्या रुग्णांनी आपले टूथब्रश कुटुंबातील अन्य सदस्य ठेवत असलेल्याच जागी ठेवू नये. यामुळे इतरांमध्ये विषाणू पसरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. अँटीसेप्टिक माउथवॉश वापरुन, ब्रश आणि टंग क्लिनर वारंवार स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. (Follow these three simple tips to prevent black fungus)

इतर बातम्या

12 आमदारांच्या नियुक्त्यांवर कधी निर्णय घेणार? HC ने राज्यपालांकडे मागितले स्पष्टीकरण

पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करा, अमृता फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें