AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2021 : भेसळयुक्त माव्याची करंजी तर खात नाही ना?; असा ओळखा चांगला मावा

होळी म्हटंले की लाल, पिवळा, हिरवा, निळा आणि इतर बर्‍याच रंगांसह या दिवशी लोकांच्या चेहऱ्याव्यतिरिक्त त्यांचे आयुष्य देखील रंगीबेरंगी होते.

Holi 2021 : भेसळयुक्त माव्याची करंजी तर खात नाही ना?; असा ओळखा चांगला मावा
करंजी
| Updated on: Mar 27, 2021 | 5:03 PM
Share

मुंबई : होळी म्हटंले की लाल, पिवळा, हिरवा, निळा आणि इतर बर्‍याच रंगांसह या दिवशी लोकांच्या चेहऱ्याव्यतिरिक्त त्यांचे आयुष्य देखील रंगीबेरंगी होते आणि नात्यांमध्ये आणखी तजेला येतो. होळी हा आनंदांचा सण आहे. होळी हा नात्यांचा सण आहे. होळी हा प्रेम आणि आनंदाचा सण आहे. जीवनातील असंख्य आठवणींना उजाळा देण्याचा हा सण आहे. या सणामध्ये मिठाई आणि चमचमीत पदार्थांना देखील खूप महत्व आहे. (Follow these tips to check for adulterated mawa)

होळीसाठी बनवल्या जाणाऱ्या खास खाद्यपदार्थांच्या यादीत ‘करंजी’ या मिठाईला पहिले स्थान आहे. मावा, नारळ आणि शेंगदाण्यांच्या मधुर मिश्रणाबरोबर, तळलेले-कुरकुरीत मिष्टान्न हे खास होळीच्या दिवशी घरोघरी बनवल्या जातात. याचा सुगंध सर्वांनाच मोहित करणार असतो. होळीसाठी ‘करंजी’ एक खास गोड पदार्थ आहे. मात्र, करंजीमध्ये जो मावा वापरला जातो तो खरेदी करताना शुद्ध मावा आहे की नाही हे आपल्याला माहिती असणे महत्वाचे आहे. कारण हा मावा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. चांगला मावा ओळखण्यासाठी खाली दिलेला टिप्स फाॅलो करा

-मावा हातात ठेवा आणि थोडावेळ चोळा. जर त्यात असलेल्या तूपाचा वास बराच काळ तुमच्या हातातून येत असेल तर मग समजून घ्या की हा मावा शुद्ध आणि ताजा आहे.

-मावा विकत घेण्यापूर्वी त्याची गोळी तळहातावर बनवा. जर त्याला भेगा पडत असतील तर समजून घ्या की त्यात भेसळ करण्यात आली आहे.

-मावा खाऊनही तुम्ही ओळखू शकता की, बनावट मावा तोंडात खातल्यावर चिकट लागतो आणि जो भेसळ न केलेला मावा असतो त्याची चव कच्च्या दुधासारखी लागते.

-थोडा मावा पाण्यात टाकून बघा पाण्यात मावा टाकल्यानंतर तो वेगळा झाला की, समजून घ्या की हा खराब झालेला आहे.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Follow these tips to check for adulterated mawa)

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.