AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Women’ Day 2021 : हेल्दी राहण्यासाठी लाईफस्टाइलमध्ये करा ‘हे’ बदल

महिला एकाच वेळी बरेच काम करण्यात पटाईत असतात. घरकाम ते आॅफिस काम यादरम्यानच्या धावपळीच्या आयुष्यात महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

International Women’ Day 2021 : हेल्दी राहण्यासाठी लाईफस्टाइलमध्ये करा 'हे' बदल
| Updated on: Mar 08, 2021 | 11:08 AM
Share

मुंबई : महिला एकाच वेळी अनेक काम करण्यात पटाईत असतात. घरकाम ते आॅफिस काम यादरम्यानच्या धावपळीच्या आयुष्यात महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. वाढत्या वयानुसार स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होतात. अशा परिस्थितीत महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभर साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगत आहोत त्यामुळे तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता. (Follow these tips to stay healthy)

-बरेच लोक आपला दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीपासून करतात. परंतु त्याऐवजी आपण एक ग्लास पाणी प्यावे. आपणास आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सकाळी लिंबू आणि मध मिसळून एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे तुमचे वजनही वाढणार नाही. आणि दिवसभर तुम्हाला चांगले देखील वाटेल.

-घरातील काम उरकून आॅफिसला निघताना बऱ्याच महिला नाश्ता करण्याकडे दुर्लक्ष करतात. किंवा थोडा वेळाने करू म्हणून त्या नाश्ता करत नाहीत. मात्र, असे न करता महिलांना सकाळी वेळ काढून नाश्ता करणे आवश्यक आहे. शक्यतो महिलांनी सकाळी हेल्दी नाश्ता केला पाहिजे.

-सर्व कामांमध्ये महिला स्वत: ला वेळ देत नाहीत. मात्र, महिलांनी दररोज व्यायामासाठी कमीत कमी 10 ते 15 मिनिट तरी वेळ दिला पाहिजे.

-हेल्दी राहण्यासाठी महिलांनी योगा, चालणे किंवा जिम लावली पाहिजे. त्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष नाही केले पाहिजे.

-महिलांच्या आहारात फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असणे आवश्यक आहे. अन्नामध्ये साखरेचे प्रमाण कमी करा. आहारात साखरेच्या अधिकतेमुळे लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

संबंधित बातम्या : 

Teeth Staining Food | पांढऱ्याशुभ्र दातांना खराब करणाऱ्या ‘या’ 6 गोष्टी वेळीच टाळा!

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

Mushroom | ‘व्हिटामिन डी’चा नैसर्गिक स्त्रोत, जाणून घ्या ‘मशरूम’ खाण्याचे फायदे…

(Follow these tips to stay healthy)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.