weight loss : वजन कमी करायचंय? मग ‘हा’ परफेक्ट डाएट करा !

आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही डाएट प्लॅन फॉलो करीत असतो.

weight loss : वजन कमी करायचंय? मग 'हा' परफेक्ट डाएट करा !
तुम्ही कधी कच्च्या खाद्यपदार्थांचा डाएट ट्राय केला आहे का? जाणून घ्या वनस्पती आधारीत पोषणाचे फायदे
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

| Edited By: अनिश बेंद्रे

May 25, 2021 | 8:13 AM

मुंबई : आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही डाएट प्लॅन फॉलो करीत असतो. तर काही जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाईजचा सहारा घेतात. मात्र यातून मनासारखे परिणाम दिसू येतातच असे नाही. पण आम्ही तुम्हाला अशा डाएट प्लानबाबत सांगणार आहोत जो फॉलो केल्यानंतर तुमचे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. (Follow this perfect diet to loss weight)

काय आहे डाएट पॅटर्न? वजन कमी करण्यासाठी डाएट सर्वात महत्वपूर्ण असते. हा डाएट वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे. या डाएटमध्ये आठवड्यातील तीन दिवस कमी कॅलरी असलेले हेल्दी फूड खायचे आहे. तर उरलेले चार दिवस डाएटचे पालन करायचे नाही. जोपर्यंत तुमचे वजन कमी करण्याचे लक्ष्य पूर्ण होत नाही तोपर्यंत हे डाएट फॉलो करायचे आहे.

एक्सरसाईज किती करावी? हे डाएट कमी कॅलरीजवर आधारीत आहे. जर तुम्ही हे डाएट फॉलो करीत असाल तर केवळ 20 मिनिटे चालणे पुरे आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त अन्य काही एक्सरसाईज जरुरी नाही. मात्र हे डाएट फॉलो करताना तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमी असू शकते ज्यामुळे तुम्हाला कमजोरी येऊ शकते. त्यामुळे हे डाएट फॉलो करण्याआधी तुमच्या न्यूट्रिशियनचा सल्ला अवश्य घ्या.

डाएट प्लॅन 

– दिवसाची सुरुवात एक ग्लास पाण्याने करा.

– यानंतर आपण गरमा गरम ब्लॅक टी किंवा ग्रीन टी पिऊ शकता.

– न्याहारीमध्ये, आपण मोठ्या वाडग्यामध्ये सूप पिऊ शकता, ज्यामध्ये भरपूर भाज्या असाव्यात.

– दुपारच्या जेवणासाठी व्होल व्हिट ब्रेडचे दोन तुकडे खा

– यानंतर, आपण एखाद कप सूप पिऊ शकता.

– संध्याकाळी ग्रीन टी पिऊ शकता.

– संध्याकाळी चहा किंवा कॉफी पिणे टाळा.

– रात्रीच्या जेवणात भरपूर भाज्यांनी बनलेळे सँडविच खा.

– रात्री जेवणात वापरला जाणारा ब्रेड ओट्स किंवा व्होल व्हिट असल्यास ते अधिक चांगले होईल.

हे लक्षात ठेवा! डाएट प्लॅन सुरु असताना हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की, सर्व लोकांचे शरीर एकसारखे नसते. या आहाराचे पालन केल्यास काही लोकांचे वजन कमी जलद गतीने कमी होईल, इतर कोणाला त्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो.

(टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Holi 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम!

(Follow this perfect diet to loss weight)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें