Face Mask : निर्जीव आणि निस्तेज त्वचेला टवटवीत करण्यासाठी वापरा टरबूजाचे फेस मास्क

टरबूज हे एक अतिशय चवदार फळ आहे. उन्हाळ्यात तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. हे तुम्हाला उन्हाळ्यात अनेक आजारांपासून दूर ठेवते. टरबूजमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते.

Face Mask : निर्जीव आणि निस्तेज त्वचेला टवटवीत करण्यासाठी वापरा टरबूजाचे फेस मास्क
चेहऱ्यासाठी वापरा टरबुजाचे फेस मास्कImage Credit source: herzindagi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 8:35 PM

उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचा निर्जीव (Inanimate) आणि निस्तेज होते. अशा वेळी उन्हाळ्यात येणाऱया काही हंगामी फळांचा (seasonal fruits) वापर करून, आपण त्वचेला तजेला देऊ शकतो. टरबूज हे फळ हे आपल्याला उन्ह्याळ्यातील हंगामी ऍलर्जी आणि संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्वचेसाठीही ते खूप फायदेशीर आहे. तुम्ही टरबूजचा वापर फेस मास्क म्हणूनही करू शकता. तुम्ही नैसर्गिक घटक (Natural ingredients)वापरून विविध प्रकारचे फेस मास्क बनवू शकता. जास्त सूर्यप्रकाशामुळे मेलॅनिन तयार होतो. त्यामुळे त्वचा काळी पडते. त्वचेवर टॅन दिसतात. अशा परिस्थितीत तुम्ही टरबूजाचा रस आणि मध वापरून फेस पॅक बनवू शकता. फेस पॅक बनविण्यासाठी टरबूजाचा रस आणि मध हे दोन्ही समान प्रमाणात घ्या. एकत्र मिसळा. ते त्वचेवर लावा. 20 ते 25 मिनिटे त्वचेवर राहू द्या. ताज्या थंड पाण्याने ते धुवा.

ग्लोइंग स्किनसाठी फेस मास्क

दही केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. हे त्वचा चमकदार बनवण्याचे काम करते. हा फेस मास्क बनवण्यासाठी एक लहान भांड घ्या, त्यात एक चमचा दही घाला. त्यात अर्धा कप टरबूजाचा रस घालून, ते चांगले मिसळा. हा मास्क तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने धुवा.

कोरड्या त्वचेसाठी फेस मास्क

लिंबू मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याचे काम करते. लिंबाचा रस आणि टरबूजाचा रस मिसळूनही तुम्ही फेस मास्क बनवू शकता. यासाठी एका लहान भांड्यात दोन चमचे टरबूजाचा रस घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून, ते चांगले मिसळा. हा फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. मध तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते.

चमकणाऱ्या त्वचेसाठी फेस मास्क

हा फेस मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा टरबूजाचा रस घ्या. त्यात एक चमचा कच्चे दूध घालून चांगले मिसळा आणि चेहरा धुतल्यावर चेहऱ्यावर लावा. 20 ते 25 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवा.

वरील टीप्स फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा.)

Skin care : कडुलिंबाचे हे फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या लगेचच दूर करा!

Skin Care : उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवायचे आहे? मग हे घरगुती उपाय करा आणि फरक पाहा!

Hair Care Tips : ग्लिसरीन फक्त त्वचेसाठीच नाहीतर केसांसाठीही अत्यंत फायदेशीर, वाचा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.