AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅनिटायझरपासून परफ्यूमपर्यंत पायलटना कोणत्या गोष्टींवर असते बंदी?

पायलट हा हजारो प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असतो. त्यामुळे टेकऑफच्या वेळी त्याच्या सतर्कतेला कोणताही अडथळा येऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाते. यासाठी काही विशिष्ट वस्तूंवर पायलटसाठी पूर्णतः बंदी घालण्यात आलेली असते. कोणत्या गोष्टी आणि का बंद करण्यात आल्या आहेत, हे जाणून घेणं नक्कीच महत्त्वाचं आहे.

सॅनिटायझरपासून परफ्यूमपर्यंत पायलटना कोणत्या गोष्टींवर असते बंदी?
| Edited By: | Updated on: Jul 14, 2025 | 4:47 PM
Share

जेव्हा आपण विमानप्रवास करतो, तेव्हा आपल्याला प्लेनमध्ये एक खाससा, सौम्य सुगंध जाणवतो. तो सुगंध मनाला फ्रेश करतो. पण तुम्ही कधी विमानात पायलट किंवा एअरहोस्टेसजवळून गेलात का? जर गेलात, तर लक्षात आलं असेल की त्यांच्या अंगाला कधीही हार्श, म्हणजेच तीव्र परफ्युमचा वास येत नाही. यामागे काही गंभीर कारणं आहेत. पायलटांना आणि क्रू मेंबर्सना काही विशिष्ट वस्तू वापरण्यास स्पष्ट मनाई असते यात परफ्युम, सैनिटायझर, माउथवॉश, टूथपेस्ट, इथपासून ते काही औषधांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. चला तर जाणून घेऊया यामागचं शास्त्र आणि डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने दिलेली मार्गदर्शक तत्त्वं.

पायलटांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून…

पायलट हा हवाई प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. उड्डाण करताना त्याचे पूर्ण लक्ष विमानावर असणे आवश्यक असते. अशावेळी जर त्याने परफ्युम वापरला, आणि त्याचा वास फारसा तीव्र असेल, तर त्याचे लक्ष सहजच विचलित होऊ शकते. एवढंच नाही, तर यामुळे काही प्रवाशांना अ‍ॅलर्जी देखील होऊ शकते. काहींना श्वास घेण्यास अडचण देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे DGCA ने स्पष्ट नियम केला आहे की पायलट आणि केबिन क्रूने कोणतीही अति सुगंधी गोष्ट वापरू नये.

एल्कोहोल आणि ब्रेथ अ‍ॅनालायझर टेस्ट

एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फ्लाइट उड्डाणापूर्वी प्रत्येक पायलट आणि क्रू मेंबरचा ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर टेस्ट’ केला जातो. हा टेस्ट यासाठी केला जातो की त्यांनी काही वेळ आधी एल्कोहोल घेतली नाही ना, हे तपासावं. पण परफ्युम, सैनिटायझर, माउथवॉश, टूथपेस्ट यासारख्या अनेक वस्तूंमध्ये लपूनछपून एल्कोहोल असतो. त्यामुळे अशा गोष्टी वापरल्यास टेस्टचा रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर पायलटला निलंबन किंवा आर्थिक नुकसान भोगावं लागू शकतं.

या वस्तूंवर आहे सक्त बंदी

1. परफ्युम आणि डिओड्रंट – यातील सुगंध पायलटच्या एकाग्रतेत व्यत्यय आणू शकतो.

2. हँड सैनिटायझर – यात असणाऱ्या अल्कोहोलमुळे ब्रेथ अ‍ॅनालायझर टेस्टचा परिणाम चुकीचा येऊ शकतो.

3. माउथवॉश – बहुतेक माउथवॉशमध्ये अल्कोहोल असतो, जो अल्कोहोल टेस्टमध्ये अडचण निर्माण करू शकतो.

5. सुगंधीत औषधं किंवा फॉर्म्युलेशन्स – यातील घटक पायलटच्या सतर्कतेवर परिणाम करू शकतात.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.