Dress up like bollywood Diva : सोनम कपूर ते सारापर्यंत सगळ्यांनाच प्लाझो पॅन्ट्सची क्रेझ

बॉलिवूडमधील अभिनेत्रींनीसुद्धा प्लाझो पॅन्ट्सला पसंती दिलेली पाहायला मिळते.( Sonam Kapoor to Sara, everyone has a craze for plazo pants)

Dress up like bollywood Diva : सोनम कपूर ते सारापर्यंत सगळ्यांनाच प्लाझो पॅन्ट्सची क्रेझ

मुंबई : प्लाझो पॅन्ट्सनं खूप कमी वेळा चुडीदार पायजाम्याला रिप्लेस केलं आहे. तर बॉलिवूडमधील अभिनेत्रींनीसुद्धा प्लाझो पॅन्ट्सला पसंती दिलेली पाहायला मिळते. प्लाझो पॅन्ट्स खूप आरामदायी ठरतात, तसेच कुर्ता किंवा क्रॉप टॉपसोबत परिधान केल्यास स्टाइलिश लूक देता येतो. चला तर बघूया तुमच्या लाडक्या अभिनेत्रींचा प्लाझो पॅन्ट्स कॅरी करण्याचा अंदाज.

सोनम कपूर (Sonam Kapoor)
बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री सोनम कपूर तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतच ती लाल रंगाचा कुर्ता आणि प्लेन लाल प्लाझो परिधान करुन दिसली. तिच्या या कुर्त्यावर एका बाजूला खिसे होते.

आलिया भट्ट (Alia Bhatt)
फ्लोरल प्रिंटचा एक वेगळाच लूक असतो, अशात जर ती आलिया असेल तर फ्लोरल प्रिंटसारखे स्टाईलिश कपडे कसे घालायचे हे तिला चांगलंच माहित आहे. नुकतच आलिया फ्रोरल कुर्ता-प्लाझो सेट आणि फाईन प्लेन ओढणीमध्ये दिसली.

सारा अली खान (Sara Ali Khan)
सारा अली खानही काळा आणि गुलाबी प्रिंट क्रॉप टॉप आणि प्लाझो या स्टाईलिश लूकमध्ये दिसली. सारानं या ड्रेसबरोबर खूप मोठे कानातले परिधान केले होते. स्वत:ला स्टायलिश लुक देण्यासाठी तुम्ही सारासारखे आउटफिट्स वापरुन बघू शकता.

मलायका अरोरा (Malaika Arora)
पांढरा रंग अनेकांना आवडतो. काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा पांढरा चिकनवर्क कुर्ता आणि प्लाझो सेट परिधान करुन दिसली. प्लाझोच्या स्लीव्हवर फ्रिल होती. या आउटफिटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.