AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फळांच्या सालीचे फेसपॅक त्वचेसाठी गुणकारी, वाचा याबद्दल अधिक !

लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात.

फळांच्या सालीचे फेसपॅक त्वचेसाठी गुणकारी, वाचा याबद्दल अधिक !
फळांची साल
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 27, 2021 | 9:31 AM
Share

मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. विशेष म्हणजे फळांचे साल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. (Fruit peel face pack is extremely beneficial for the skin)

– केळीचे साल चेहर्‍यावरील डाग काढते. केळीच्या सालाची पेस्ट बनवण्याची गरज नाही. केळीची साल चेहऱ्यावर घासून घ्या आणि कोरडे झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. केळीमध्ये वंगण घालणारी नैसर्गिक चरबी आणि प्रथिने असतात ज्या आपल्या त्वचेला मऊ ठेवण्यासाठी आवश्यक असतात.

– कलिंगड खाणे आरोग्यासाठी जसे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच कलिंगडाची साल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कलिंगडाच्या सालीची पेस्ट तयार करून घ्या आणि यामध्ये दूध आणि गुलाब पाणी मिसळा ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे आपली त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

– आंब्याच्या सालाचे थोडेसे पीठ करून घ्या त्याची पेस्ट तयार करा त्यात मध मिसळा आणि गळ्यापासून तोंडावर लावा. कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. आंब्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे त्वचेवर बॅक्टेरियाच्या बुरशीपासून बचाव करतात तसेच वृद्धत्वाचे परिणाम कमी करतात.

– पपईची साल चेहऱ्याचा कोरडपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. सर्वात अगोदर पपईची साल वाळवावी आणि त्याची बारीक पावडर करा. दोन चमचे पपईच्या पावडरमध्ये एक चमचे ग्लिसरीन घाला आणि फेसपॅक चेहर्‍यावर लावा. फेसपॅक कोरडा झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहर्‍यावर टॅनिंगची समस्या असल्यास ताज्या पपईची साल बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळा.

– संत्रीची साल सुकवून घ्या आणि त्याचे पावडर तयार करा या पावडरमध्ये मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. थोडया हलक्या हातांनी मसाज करा, कारण फेसमास्कबरोबरच हे चांगले स्क्रब आहे. मसाज केल्यानंतर ते कोरडे होऊ द्या. नंतर कोमट पाण्याने तोंड धुवा. संत्री हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Fruit peel face pack is extremely beneficial for the skin)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल