Fitness | तासाभराच्या जीमऐवजी ‘सूर्यनमस्कार’ शरीरासाठी लाभदायी! वाचा याचे फायदे…

बाहेर जाऊन व्यायाम किंवा जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा घरच्या घरीच सूर्यनमस्कार केल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:45 PM, 11 Jan 2021

मुंबई : हिवाळ्याच्या दिवसांत, कडाक्याच्या थंडीत दररोज सकाळी एक तासासाठीही व्यायाम करणे, हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. या दिवसांत शरीर आळशी बनते, आपल्याला झोपेतून उठूच नये असे वाटते. अशा परिस्थितीत व्यायामाचा नियम बनवता येत नाही. अशावेळी बाहेर जाऊन व्यायाम किंवा जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा घरच्या घरीच सूर्यनमस्कार केल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरते. घरीच सूर्यनमस्कार केल्याने, जास्त वेळ खर्ची करावा लागत नाही आणि आपले शरीरही सर्व आजारांपासून सुरक्षित राहते (Full Body Workout Surya namaskar steps).

सूर्यनमस्काराचे फायदे :

सूर्यनमस्कारांना ‘फूल बॉडी वर्कआऊट’ म्हटले जाते. यात एकूण 12 आसने आहेत. नियमित सूर्य नमस्कार केल्याने शरीरात लवचिकता येते. तसेच, शरीरात रक्त परिसंचरण आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो. हृदयरोगाचा धोका कमी होतो, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, रोगप्रतिकारक शक्ती आणि मज्जासंस्था यांचे कार्य सुरळीत होते. सूर्यनमस्कारामुळे मधुमेह, संधिवात आणि तणाव यासारख्या आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.

सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत :

प्रणामासन

चटईच्या काठावर उभे रहा, आपले पाय एकत्र ठेवा आणि आपले वजन दोन्ही पायांवर समान प्रमाणात संतुलित करा. आपली छाती पुढे करा आणि आपल्या खांद्यांना आराम द्या. जेव्हा आपण श्वास घेता तेव्हा दोन्ही हात वर करा आणि श्वासोच्छवासाच्या वेळी आपल्या तळहातांना छातीसमोर आणून प्रणाम करा.

हस्तउत्तानासन

श्वास घेताना, कानाजवळून हात मागे घ्या. या आसनामध्ये संपूर्ण शरीर टाचांपासून बोटांच्या टिपांपर्यंत पसरण्याचा प्रयत्न केला जातो.

हस्तपादासन

श्वास घेताना, मेरुदंड सरळ ठेवा आणि कंबरेतून पुढे वाका. जेव्हा आपण संपूर्ण श्वासोच्छ्वास करता तेव्हा आपले हात पाय जवळ आणा.

अश्व संचालनासन

श्वास घेताना, शक्य असेल तितका आपला उजवा पाय मागे खेचा. तर, डावा पायचा गुडघा पुढे घ्या आणा आणि वर पाहा.

दंडासन

श्वास घेताच डावा पाय मागे घ्या आणि संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आणा.

अष्टांग नमस्कार

हळू हळू आपले गुडघे पुढे आणा आणि श्वास बाहेर सोडा. कंबरेखालील भाग पुढे सरकवा, आपल्या छाती आणि हनुवटीला फरशीवर चिकटवा. दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, छाती आणि हनुवटीने पृष्ठभागाला स्पर्श केला पाहिजे (Full Body Workout Surya namaskar steps).

भुजंगासन

पुढे सरकून छाती वर उचलून घ्या. आपण या पवित्रामध्ये आपल्या कोपरांना खांद्यांसह कानांपासून दूर ठेवू शकता.

पर्वतासन

श्वासोच्छ्वास घेताना, शरीराला उलट्या शेपटीच्या v मुद्रामध्ये आणण्यासाठी हिप्स आणि टेलबोन काहीसे वर करा.

अश्व संचालन

श्वास घेताना उजवा पाय दोन हात दरम्यान आणा. डावा गुडघा पृष्ठभागावर टेकलेला ठेवा. कंबरेखालील भाग थोडा पुढे सरकवा.

हस्तपादासन

श्वास घेताना डावा पाय पुढे आणा. तळवे जमिनीवर ठेवा. आवश्यक असल्यास, आपण गुडघे वाकवू शकता.

हस्तउत्थानासन

श्वास घेताना, मणक्याच्या बाजूने खाली वाका. हात वर करा आणि किंचित मागे वाकून, कंबरेखालील भाग थोडा बाहेरील बाजूस वाकवा.

ताडासना

श्वास सोडून, प्रथम शरीर सरळ करा, नंतर हात खाली करा. या स्थितीत विश्रांती घ्या आणि आपल्या शरीरातील संवेदनांचे निरीक्षण करा.

लक्षात ठेवा..

सूर्यनमस्कार सकाळच्या वेळेत रिकाम्या पोटी करावा. सुरुवातीला 10 ते 12 वेळा सूर्यनमस्कार घालावेत, त्यानंतर हळूहळू ही संख्या वाढवू शकता. हे आसन मऊ गादी किंवा पलंगावर करु नका. यामुळे आपल्या पाठीच्या कण्याला हानी पोहचू शकते. गर्भवती महिला, स्लिप डिस्कचे रुग्ण आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी सूर्यनमस्कार करू नये.

(Full Body Workout Surya namaskar steps)

हेही वाचा :