Weight loss : वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या ‘हे’ खास पेय !

लठ्ठपणा नको आणि निरोगी जीवन जगू इच्छित असाल तर तुम्ही काय खात आहात हे सर्वात महत्वाचे आहे. आपण अशा काही गोष्टी आपल्या आहारात घेऊ नये, ज्याने आपले वजन वाढण्याची शक्यता आहे.

Weight loss : वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या 'हे' खास पेय !
हा हळदीचा चहा तयार करण्यासाठी आपल्याला हळद, मध आणि लिंबू लागणार आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्यात उपस्थित एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.

मुंबई : लठ्ठपणा नको आणि निरोगी जीवन जगू इच्छित असाल तर तुम्ही काय खात आहात हे सर्वात महत्वाचे आहे. आपण अशा काही गोष्टी आपल्या आहारात घेऊ नये, ज्याने आपले वजन वाढण्याची शक्यता आहे. कारण एकदा आपले वजन वाढल्यानंतर, पुन्हा ते कमी करताना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अगोदरच वजन वाढू नये, आणि वाढलेले वजन कसे नियंत्रणात ठेवायचे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (Garlic and ginger water are beneficial for weight loss)

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज रिकाम्या पोटी लसूण, गूळ आणि आद्रकचे पाणी पिले पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला लसूणच्या सात ते आठ पाकळ्या, आद्रक आणि गूळ लागणार आहे. सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये लसूण आद्रक आणि गूळ मिक्स करा. हे पाणी उकळल्यानंतर गरम असतानाच प्या. यामुळे आपल्या शरीरातील चरबी बर्न होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी कॅलरी कमी करणे खूप महत्वाचे आहे. प्रथिनांप्रमाणेच कार्ब देखील शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत कारण ते ऊर्जा आणि फायबरचे मुख्य स्रोत आहेत. वयाच्या 40 व्या वर्षी शरीरात बरेच बदल होतात. या दरम्यान, शरीरात पौष्टिक अन्नाच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. आपण जर ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस आणि पुदिनाची पाने मिक्स करून पिले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते. लिंबाचा रस ग्रीन टीच्या कडू चवीचा प्रतिकार करतो.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लिंबूवर्गीय फळामचा रस ग्रीन-टीमध्ये मिसळल्यास त्यातील अँटीऑक्सिडेंट्स वाढतात, जे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत. परंतु, आपल्या ग्रीन-टीला आधी थंड होऊ द्या आणि नंतरच त्यात थोडे लिंबू पिळून मग त्याचे सेवन करा. ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याला खूप जास्त गरम करु नका. त्यामुळे त्यात आवश्यक जीवनसत्त्व नष्ट होतात. जर आपण घराबाहेर जाऊन व्यायाम करू शकत नसतोल तर आपण दोरीवरच्या उड्या मारून वजन कमी करू शकतो. दोरीवरच्या उड्यांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Garlic and ginger water are beneficial for weight loss)