AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस केराटिनसारखे होतील मऊ, फक्त ‘हे’ 4 नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर

केवळ नैसर्गिक घटकांचा वापर करूनच तुम्ही तुमचे केस निरोगी ठेवू शकता. या लेखात आपण चार प्रकारच्या नैसर्गिक हेअर मास्क कसे बनवायचे आणि केसांवर वापर कसा करायचा हे जाणून घेऊयात.

केस केराटिनसारखे होतील मऊ, फक्त 'हे' 4 नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर
Hair Mask
| Edited By: | Updated on: Jun 23, 2026 | 2:45 PM
Share

बदलत्या वातावरणात केसांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. रोजच्या धावपळीत केसांची काळजी घेता येत नाही, तेव्हा केस निरोगी ठेवण्यासाठी आपण आठवड्याच्या शेवटी हेअर केअर प्लॅन करतो. यामध्ये आठवड्यातून एकदा केसांना तेल लावणे, एकदा एक्सफोलिएट करणे आणि त्यानंतर पुढच्या वेळी हेअर मास्क लावणे यांचा समावेश करत राहणे. अशा प्रकारे, तुम्ही दर 15 दिवसांनी हेअर मास्क लावू शकता. जर तुमचे केस विशेषतः कोरडे असतील तर तुम्ही नैसर्गिक घटकांपासून घरीच बनवलेल हेअर मास्क दर 8 दिवसांनी लावू शकता. तर आजच्या लेखात आपण अशा चार हेअर मास्कबद्दल जाणून घेऊयात जे तुमचे केस मऊ, चमकदार आणि मुलायम बनवण्यास मदत करतील.

घरगुती पद्धतीने बनवलेले सर्व हेअर मास्कमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो, जे केसांना पोषण देतात, मजबूत करतात आणि त्यांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. चला तर मग,हे हेअर मास्क कसे बनवायचे आणि लावायचे ते सविस्तरपणे जाणून घेऊयात.

अंडी व दह्याचा हेअर मास्क

अंडी आणि दह्याचा हेअर मास्क तुमच्या केसांना प्रथिने (प्रोटीन) पुरवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हा मास्क तुमचे केस केवळ चमकदार आणि मुलायमच बनवणार नाही, तर प्रथिनांसोबतच अनेक पोषक तत्वे पुरवून त्यांना अधिक निरोगी देखील बनवेल. हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुमच्या केसांच्या लांबीनुसार २ ते ३ अंडी, दही, 1 चमचा खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह तेल, 1 चमचा मध घेऊन मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण स्कॅल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत लावा आणि 30 मिनिटे तसेच राहू द्या.

कोरफड हेअर मास्क

कोरफड जो सहज उपलब्ध होणारा घटक आहे, तुमच्या केसांना खोलवर आर्द्रता देण्यासाठी आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी एक उत्कृष्ट घटक आहे. यामुळे स्कॅल्पचे आरोग्यही सुधारते. पुरेसा कोरफडीचा गर घ्या, त्यात व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल आणि एरंडेल तेल मिक्स करा, सर्व मिश्रण चांगले एकजीव करा आणि स्कॅल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत लावा. जर तुम्हाला कोंडा असेल तर तुम्ही त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब देखील मिक्स करू शकता.

अळशी आणि भेंडीचा हेअर मास्क

3-4 मोठे चमचे अळशी पाण्यात उकळा, जोपर्यंत त्याला जेलीसारखा घट्टपणा येत नाही. ही अळशीची जेली शिजवलेल्या भातासोबत वाटून घ्या. मिश्रणात थोडे कोरफडीचे जेल मिक्स करा. हे मिश्रण तुमच्या स्कॅल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत लावा. यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळेल आणि ते मऊ व चमकदार होतील.

केळीचा हेअर मास्क

केळ्यांमध्ये असे नैसर्गिक घटक असतात जे केस मऊ करतात, खोलवर पोषण देतात आणि स्कॅल्प निरोगी ठेवण्यास मदत करतात. केळं, दही आणि 2 चमचे मध एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट स्कॅल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत व्यवस्थित लावा. केसांवर हेअर कॅप घाला आणि 30 मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
कोण होतास तू, काय झालास तू...; विधानसभेत शिंदेंकडून टोलेबाजी
Eknath Shinde On Thackeray | कोण होतास तू, काय झालास तू...; विधानसभेत शिंदेंकडून कविता म्हणत टोलेबाजी
कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत...
Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी...
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी... पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक...
मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?
बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही...
बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही', बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजे
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता...
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!
निधी मिळत नाही कारण...निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण...तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगित
Vidhan Parishad | नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगितलंच