AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढत्या वीज बिलापासून होईल सुटका, फक्त रात्री झोपण्यापूर्वी ‘ही’ इलेक्ट्रॉनिक उपकरणे करा बंद

वाढते वीज बील कमी व्हावे यासाठी झोपण्यापूर्वी केवळ काही उपकरणे बंद करणे पुरेसे नाही, तर ती अनप्लग देखील केली पाहिजेत. या सवयीमुळे केवळ विजेची बचत होत नाही, तर तुम्हाला वीज बिल देखील कमी येईल. चला तर मग याविषयी जाणून घेऊयात.

वाढत्या वीज बिलापासून होईल सुटका, फक्त रात्री झोपण्यापूर्वी 'ही' इलेक्ट्रॉनिक उपकरणे करा बंद
light
| Edited By: | Updated on: Aug 25, 2026 | 10:23 PM
Share

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक घरांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणेही आहेतच. त्यामुळे महिन्या अखेरीस मात्र येणाऱ्या अव्वाच्या सव्वा वीज पाहून अनेकांच्या खिशाला मात्र जबर कात्री बसते.तर तुमचेही विजेचे बिल दर महिन्याला अपेक्षेपेक्षा जास्त येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फक्त रात्री झोपायला जाण्याआधीची ही एक छोटी सवय वीज बिलाची रक्कम कमी करण्यास मदत करू शकते. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (UPPCL) रहिवाशांना रात्री चार्जर, अडॅप्टर आणि अनावश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे हे आवाहन आपल्या सर्वांच्या कामी येणारं आहे. विभागाने “चार्ज इट राईट, अनप्लग ॲट नाईट” (Charge it Right, Unplug at Night) ही संकल्पना मांडली आहे. यामुळे विजेचा अपव्यय कमी होण्यास आणि उपकरणांची सुरक्षितता व आयुष्य वाढण्यास मदत होऊ शकते. चला तर मग आणखीन कोणती उपकरणे बंद करावी याबद्दल जाणून घेऊयात.

तुम्ही रात्री झोपायला जाण्याआधी मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे चार्जर आणि राउटरसारखी उपकरणे अनप्लग करण्याची शिफारस करते. तुम्ही झोपण्यापूर्वी तुमचा फोन चार्ज करू शकता आणि नंतर सॉकेटमधून चार्जर काढून ठेवा. त्याचप्रमाणे वापरात नसताना तुम्ही तुमचा राउटर अडॅप्टर अनप्लग करू शकता. घरात वापरली जाणारी काही जड उपकरणे, जसे की फायरप्लेस, गिझर, मायक्रोवेव्ह आणि टेलिव्हिजन यांसारखी उपकरणे देखील रात्री झोपण्याआधी अनप्लग केली जाऊ शकतात. त्यावेळी गरज नसलेल्या उपकरणांमुळे होणारा अनावश्यक वीज वापर कमी करणे, हा यामागील उद्देश आहे.

वीज आणि उपकरणे या दोन्हींची बचत

काही उपकरणे सतत प्लग इन केलेली असताना स्टँडबाय मोडमध्येही वीज वापरत राहतात. शिवाय सतत चार्जिंग, उष्णता आणि व्होल्टेजमधील चढउतार यांचा उपकरण किंवा चार्जरवर परिणाम होऊ शकतो.

रात्री उपकरणे अनप्लग केल्याने विजेचा वापर कमी होण्यास आणि त्यांचे आयुष्य वाढण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रात्री लोड आणि विजेच्या चढउतारांची शक्यता असते, त्यामुळे उपकरणे अनप्लग केल्याने त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते.

किती वीज आणि पैशांची बचत होऊ शकते?

उपलब्ध माहितीनुसार एका सामान्य कुटुंबाच्या वीज बिलातील अंदाजे 5 ते 10‍ टक्के खर्च स्टँडबाय पॉवरवर होऊ शकतो. रात्री अनावश्यक उपकरणे बंद ठेवल्यास वर्षाला 100 ते 300 युनिट विजेची बचत होते असा अंदाज आहे. चार्जर आणि अडॅप्टरसारखी लहान उपकरणे रात्री बंद ठेवल्यास दरमहा अंदाजे 3 ते 10 युनिट विजेची बचत होऊ शकते. रेफ्रिजरेटर आणि गिझरसारखी मोठी उपकरणे बंद ठेवल्यास दरमहा 5 ते 7 युनिट विजेची बचत होते असा अंदाज आहे.

Follow Us