AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अ‍ॅसिडीटी झाल्यावर आईस्क्रिम खाणे योग्य असते का? खरंच त्रास कमी होतो का जाणून घ्या

आपण अनेकदा अॅसिडीटी झाल्यावर आईस्क्रिम खातो. पण आईस्क्रिम खाणे हे खरच योग्य असते का? चला जाणून घेऊया...

अ‍ॅसिडीटी झाल्यावर आईस्क्रिम खाणे योग्य असते का? खरंच त्रास कमी होतो का जाणून घ्या
AcidityImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Mar 21, 2025 | 6:03 PM
Share

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उकाडा प्रचंड वाढतो. गरमीमुळे लोक हैराण होतात. उकाड्यामुळे आपण पाणीपिण्यावर जास्त भर देतो. त्यामुळे भूक कमी लागते. जेवण वेळेवर न केल्यामुळे अॅसिडीटीचा त्रास होऊ लागतो. छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे अनेकजण अॅसिडीटी कमी करण्यासाठी आईस्क्रिम खाताना दिसतात. पण अॅसिडीटी झाल्यावर खरच आईस्किम खाणे योग्य असते का? चला जाणून घेऊया…

आईस्क्रिम खाणे फायदेशीर?

काही अभ्यासांमध्ये असे स्पष्ट झाले आहे की दुग्धजन्य पदार्थांमुळे पित्त वाढण्याची शक्यता असते. पण, दूध हे पूर्णअन्न आणि नैसर्गिक अ‍ॅन्टासिड म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जेवणानंतर इतर काही गोडाचे पदार्थ खाल्ल्यास त्रास होतो. ते आरोग्याला देखील फायदेशीर ठरत नाहीत. दूधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असतात. तसेच दूधामुळे शरीरात अ‍ॅसिड साचून राहण्यास प्रतिबंध होतो. तसेच शरीरातील अतिरिक्त अ‍ॅसिड दूधात शोषले जाते. म्हणूनच जेवणानंतर कपभर व्हॅनिला आईस्क्रिम खाल्ल्यास पचन सुधारते आणि छातीत होणार्‍या जळजळीपासून आराम मिळण्यास मदत होते.

आपण खाल्लेले अन्न पोटात गेल्यानंतर डायजेस्टिव ज्युस (अन्नरस) पोषणद्रव्यांचे शोषण करण्यासाठी मदत करतात. अन्नाचे विघटन होऊन तयार होणारे रस अ‍ॅसिडीक असतात. ते पोटात राहणे आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र पचनप्रक्रियेमध्ये काही बिघाड झाल्यास ते पुन्हा तोंडाजवळ येतात हे अ‍ॅसिडीटीच्या लक्षणांमधून आपल्याला समजते. त्यामुळे जेवणानंतर आईस्क्रिम खाणे पचनासाठी चांगले असते.

कधी कधी अॅसिडीटी झाल्यानंतर आपण अ‍ॅन्टासिड्स घेतो. अॅसिडीटीचा त्रास दूर करण्यासाठी गोळ्या किंवा औषध घेण्यापेक्षै व्हेनिला आईस्क्रिम खाणे चांगले असते. इतर आईस्क्रिमच्या तुलनेत व्हेनिला आईस्क्रिममध्ये साखरेचे प्रमाण आटोक्यात असते. ‘गरोदरपणात स्त्रियांना अ‍ॅसिडीटी किंवा हार्टबनचा त्रास होत असल्यास गर्भवती स्त्रियादेखील कपभर व्हेनिला आईस्क्रिम खाऊ शकतात’ असा सल्ला एक्सपर्ट देतात. विशेषता हे आईस्क्रिमजर घरी दूधापासून बनवलेले असेल तर ते अॅसिडीटी दूर करण्यास चांगली मदत करते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.