Goa फिरण्याचा विचार करत आहात? ‘हे’ स्ट्रीट फूड नक्की ट्राय करुन पाहा, तुम्ही चव कधीच विसरणार नाही

Goa Famous Street Foods : फिरायला गेल्यानंतर कोणत्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.. म्हणूम गोव्यातील चविष्ठ पदार्थांबद्दल घ्या जाणून, गोव्यात गेल्यानंतर काही ठरावीक पदार्थ नक्की खा...

Goa फिरण्याचा विचार करत आहात? 'हे' स्ट्रीट फूड नक्की ट्राय करुन पाहा, तुम्ही चव कधीच विसरणार नाही
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 3:22 PM

Goa Famous Street Foods : गोवा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. गोवा याठिकाणी अनेक सुंदर ठिकाणे आणि समुद्र किनारे आहेत. अनेक जण मित्रांसोबत, कुटुंबासोबच गोव्याला जाण्यासाठी प्लॅन करतात. पण गोव्याला फिरायला गेल्यानंतर कोणते पदार्थ बेस्ट आहेत? याबद्दल फार कोणाला माहिती नाही. जर तुम्ही लवकरच गोव्यात जाणार असाल तर, तुम्ही इथल्या काही स्वादिष्ट स्ट्रीट फूड्सचा आस्वाद नक्कीच घ्यावा. हे स्ट्रीट फूड खूप लोकप्रिय आहेत.

गोव्यातील हे स्ट्रीट फूड तुमच्या ट्रिपची मजा द्विगुणित करतील. यामध्ये गडबड आईस्क्रीमपासून लोकर रोझ ऑम्लेट पावापर्यंत विविध स्ट्रीट फूडचा समावेश आहे. गोव्यात तुम्ही इतर कोणते स्ट्रीट फूड ट्राय करू शकता ते जाणू घ्या…

मिसळ पाव : मिसळ पाव खूप चविष्ट आसते. अनेक ठिकाणी मिसळ पाव मिळते. गोव्यातली मिसळ पाव देखील तुम्ही ट्राय करु शकता. . हे गोव्याचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. डाळी आणि मसाले इत्यादी पदार्थ वापरून मिसळ पाव बनते.

हे सुद्धा वाचा

गडबड आइस्क्रीम : गोव्यातील गडबड आइस्क्रीम देखील तुम्ही नक्की ट्राय करा. गडबड आइस्क्रीममध्ये अनेल फ्लेव्हर असतात. एका मोठ्या ग्लासात गडबड आइस्क्रीम दिली जाते. यामध्ये फालूदा, शेवई, जेली किंवा जॅम टाकून खास अंदाजात लोकांना दिली जाते.

फ्रँकी : उत्तर गोव्याचा उत्कृष्ट स्ट्रीट फूड आहे. हा एक लोकप्रिय नाश्ता आहे. फ्रँकीमध्ये स्टफिंगचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये भाज्या, सोया चंक्स, अंडी आणि चिकन इत्यादींचा समावेश आहे.

रोझ ऑम्लेट पाव : गोव्याचा उत्कृष्ट स्ट्रीट फूड आहे. हा एक प्रकारणा मसाला ऑम्लेट पाव असतो. ऑम्लेट मसालेदार ग्रेव्हीमध्ये सर्व्ह केले जाते. ऑम्लेट सोबत पाव दिला जातो. जर तुम्हाला ऑम्लेट खायला आवडत असेल तर तुम्हाला रोझ ऑम्लेट पाव देखील खूप आवडेल.

फिश थाळी : गोव्यात तुम्ही स्ट्रीट फूडचाही आनंद घेऊ शकता. या थाळीमध्ये रोटी, भात, फिश करी, तळलेले मासे, लोणची आणि भाज्या इत्यादींचा समावेश आहे. या थाळीचा आनंद तुम्ही गोव्यातही घेऊ शकता.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.