राजेशाही’ आजार म्हणून ओळखला जाणारा ‘गाउट’..! लहान वयातच गुडघेदुखी सुरु झाल्यास वेळीच ओळखा धोका!

‘गाउट’ हा एक प्रकारचा अर्थराइटिस आजार आहे. त्याला राजाचा रोग किंवा राजे श्रीमंतांचा रोग म्हणतात. त्यामुळे ३० वर्षांच्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. ते वेळीच ओळखले तर पुढील धोके टाळता येतील.

राजेशाही’ आजार म्हणून ओळखला जाणारा ‘गाउट’..! लहान वयातच गुडघेदुखी सुरु झाल्यास वेळीच ओळखा धोका!
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 4:07 PM

पूर्वीच्या काळी लोकांना वय झाल्यावरच सांधे आणि गुडघेदुखीचा (Joint and knee pain) त्रास होत असे, पण आजच्या काळात तरुणांनाही गुडघेदुखीची तक्रार होऊ लागली आहे. गुडघेदुखीची अनेक कारणे असू शकतात, जसे की, बसण्याची चुकीची पद्धत, लठ्ठपणा, दुखापत, कॅल्शिअमची कमतरता (calcium deficiency), स्नायूंचा ताण, अवयवांना झालेली इजा, बर्साइटिस, संधिवात इत्यादी. या कारणांची वेळीच दखल घेतली तर, पुढील धोके (Further dangers) दूर किंवा कमी करता येऊ शकते. संशोधनानुसार, प्रत्येक 100 पैकी दोघांना संधिवात आहे. ज्यामुळे गुडघेदुखी आणि जडपणा येतो. अनेकांना वयाच्या ३० व्या वर्षी गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. या वयातील लोकांमध्ये गुडघेदुखीचे कारण ‘किंग्ज डिसीज’ देखील असू शकते. हा आजार काय आहे? मी हे कसे टाळू शकतो? याबद्दल जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे.

राजांचा आजार

पबमेड च्या मते, ‘राजांचा आजार’ किंवा ‘श्रीमंत माणसाचा आजार’ ज्यामुळे गुडघेदुखी होऊ शकते त्याला गाउट म्हणतात. गाउट बद्दलचे सर्वात जुने दस्तऐवज 2600 ईसा पूर्व इजिप्तमधील आहेत, ज्यामध्ये गाउटचे वर्णन केले आहे. 2 हजार 640 ईसापुर्व मध्ये इजिप्शियन लोकांनी प्रथम गाउट ओळखला आणि नंतर पाचव्या शतकात ग्रीक चिकित्सक हिप्पोक्रेट्सने याची पुष्टी केली. ‘गाउट’ हा लॅटिन शब्द गुट्टा(gutta) पासून आला आहे.

संधिरोग काय आहे

द मिररच्या मते, गाउट हा संधिवाताचा एक प्रकार आहे. संधिवात रोगात, सोडियम युरेटचे स्फटिक सांध्यामध्ये आणि आजूबाजूला तयार होऊ लागतात, ज्यामुळे तीव्र वेदना आणि सूज येते. संधिरोगाचा सामान्यतः पायाचा सांधा, घोट्याचा सांधा आणि गुडघ्याच्या सांध्यावर परिणाम कारक असतो. असे म्हटले जाते की,जेव्हा श्रीमंत लोक जास्त अनहेल्दी फूड्स खात असत आणि दारू प्यायचे तेव्हा त्या लोकांना हा आजाराची लागण हेात असे, म्हणून त्याला आजही श्रीमंतांचा आजार म्हणतात. त्याच्या आहारात अल्कोहोल, रेड मीट, ऑर्गन फूड आणि सीफूडचा समावेश होता. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, गाउटची स्थिती प्रामुख्याने 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना आणि रजोनिवृत्तीनंतर महिलांना प्रभावित करते.

संधिवाताची लक्षणे काय आहेत?

जरी संधिवाताची लक्षणे सामान्य असली तरी, ती खालील लक्षणांवरून समजू शकतात. जर तुम्हाला खालील लक्षणे दिसली तर ती संधिवात या रोगाचे संकेत असू शकतात. ही लक्षणे साधारणपणे पाच ते सात दिवस टिकू शकतात. संधिवाताची लक्षणे आहेत:

  1. अचानक सांधेदुखी
  2.  पायाचे बोट दुखणे
  3.  हात, मनगट, कोपर किंवा गुडघेदुखी
  4.  सांध्यावर सूज येणे
  5.  वेदनादायक सांध्यावर सूज येणे
  6.  सांधेदुखीसह ताप
  7.  सांधेदुखीसह थंडी वाजणे

संधिवातची काय आहेत कारणे?

हेल्थलाइनच्या मते, असे काही घटक आहेत जे गाउटची स्थिती निर्माण करू शकतात आणि वाढवू शकतात. यापैकी बहुतेक घटक लिंग, वय आणि जीवनशैली यावर आधारित आहेत. खाली नमूद घटकांमुळे संधिवात रोगाची स्थिती उद्भवते:

  1.  अधीक वय
  2.  लठ्ठपणा
  3.  प्युरिन आहार
  4.  दारू
  5.  गोड थंड पेय
  6.  सोडा
  7.  फ्रक्टोज कॉर्न सिरप
  8.  प्रतिजैविक आणि औषधे जसे की सायक्लोस्पोरिन

संधीवाताची लक्षणे दिसल्यास काय करावे?

या लक्षणांची वेळीच काळजी घेतली तर गंभीर संधिरोग टाळता येऊ शकतो. जर अशी लक्षणे एखाद्या व्यक्तीमध्ये आढळून आलीच तर याचा अर्थ सांध्यातील संसर्ग वाढणे देखील होऊ शकते. जर एखाद्याला जास्त सांधेदुखी, थंडी ताप, खाण्या-पिण्यास असमर्थ असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.