Sesame Oil | चमकदार त्वचेसह अकाली पांढऱ्या होणाऱ्या केसांवर गुणकारी उपाय ‘तिळाचे तेल’

आरोग्याच्या दृष्टीने तिळाचे तेल अतिशय फायदेशीर मानले जाते. कदाचित याचमुळे भारतात धार्मिक किंवा मंगल कार्यात तिळाचे तेल वापरण्यावर अधिक जोर दिला जातो.

Sesame Oil | चमकदार त्वचेसह अकाली पांढऱ्या होणाऱ्या केसांवर गुणकारी उपाय 'तिळाचे तेल'
तीळ
Harshada Bhirvandekar

|

Jan 29, 2021 | 4:06 PM

मुंबई : वर्षांनुवर्ष आपल्या जेवणात, मालिशसाठी आणि अगदी मंगल कार्यातही तिळाच्या तेलाचा (Sesame Oil) वापर केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने तिळाचे तेल अतिशय फायदेशीर मानले जाते. कदाचित याचमुळे भारतात धार्मिक किंवा मंगल कार्यात तिळाचे तेल वापरण्यावर अधिक जोर दिला जातो. म्हणूनच हवन, पूजा-पाठ आणि लग्नाच्या विधींमध्येही याचा वापर अनिवार्य आहे. तिळाच्या तेलाचा वापर अनेक अन्नपदार्थात तर केला जातोच, पण यातील औषधीय गुणांमुळे या तेलाचा वापर हा त्वचेला उजळवण्यासाठी आणि केसांचं पोषण करण्यासाठी देखील केला जातो(Hair and skin benefits of Sesame oil).

तिळामध्ये मिनरल्स, ओमेगा फॅटी अॅसिड असे तुमच्या शरीराला उपयोगी ठरणारी पोषणद्रव्य आढळतात. त्यामुळे तिळाचे तेल खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. तिळाच्या तेल हे बियांपासून (sesame seeds) काढले जाते. तिळाच्या बिया या छोट्या आणि पिवळ्या करड्या रंगाच्या असतात. भारतच नव्हे, तर चायनीज, जपानी आणि अन्य देशातील विविध पदार्थांमध्येही तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. हे तेल त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील अतिशय लाभदायी मानले जाते.

केसांच्या समस्येवर गुणकारी तिळाचे तेल

– तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमीन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस आणि प्रोटीन हे घटक आढळतात. केसांच्या संपूर्ण पोषणासाठी तिळाचे तेल हे खूपच फायदेशीर मानले जाते.

– तिळाचे तेल हलके गरम करून, मग या तेलाने हलक्या हाताने तुमच्या स्कॅल्पला मसाज करा. काही वेळ हे तेल केसांमध्ये असंच राहू द्या आणि मग सध्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसांना आतून पोषण मिळेल.

– तिळाचे तेल केसांना फक्त चमकच नाहीतर त्यांना मजबूतीही देते. जर तुम्हाला केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल, तर तिळाच्या तेलाचा वापर नक्की करून पाहा. याने केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील दूर होते.

– तिळाच्या तेलाने मसाज केल्यास रक्त परिसंचलन चांगले होते. ज्यामुळे केस लवकर वाढतात. जर केस पूर्ण वाढण्याआधीच तुटत असतील तर तिळाच्या तेलाचा वापर करावा. शिवाय केसातील कोंडा देखील याने दूर होईल (Hair and skin benefits of Sesame oil).

त्वचेच्या समस्याही करेल दूर

– सकाळी आणि संध्याकाळी तिळाचे तेल चेहऱ्याला लावल्यास त्वचेला आर्द्रता मिळते. थंडींच्या दिवसात चेहऱ्यावर तिळाचे तेल लावल्याने त्वचेवर चमक येते.

– चेहऱ्यावर तिळाचे तेल लावून, 5 मिनिटानंतर चेहऱ्यावर तांदूळाचे पिठ लावून स्क्रब करा. स्क्रब केल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि काही काळाने चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा. यामुळे तुमची त्वचा कोमल होईल.

– तिळाच्या तेलामध्ये मुलतानी माती आणि हळद मिसळून हा फेस मास्क 30 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि सन टॅनपासूनही बचाव होईल.

– तिळाच्या तेलामध्ये अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने गरम पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर जमलेली धूळ आणि घाण निघून जाईल आणि चेहरा तेलकटही दिसणार नाही.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Hair and skin benefits of Sesame oil)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें