AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care | लिंबासह ‘या’ घटकाचे मिश्रण देईल कोंड्याच्या समस्येपासून मुक्ती, नक्की ट्राय करून पाहा!

केसांत कोंडा होण्याची समस्या खूप सामान्य आहे. परंतु, जर आपण ही समस्या वेळेत सोडवली नाही तर, ती कायम स्वरूपी त्रासदायक ठरू शकते.

Hair Care | लिंबासह ‘या’ घटकाचे मिश्रण देईल कोंड्याच्या समस्येपासून मुक्ती, नक्की ट्राय करून पाहा!
कोंड्याची समस्या
| Updated on: Feb 14, 2021 | 6:00 PM
Share

मुंबई : केसांत कोंडा होण्याची समस्या खूप सामान्य आहे. परंतु, जर आपण ही समस्या वेळेत सोडवली नाही तर, ती कायम स्वरूपी त्रासदायक ठरू शकते. डोक्यातील कोंड्यामुळे फक्त आपले केस खराब नाहीत. तर, त्यासोबतच आपल्या चेहर्‍यावर, पाठीवर, खांद्यावरही बर्‍याच समस्या वाढतात (Hair care tips for dandruff using lemon and coconut oil).

उदाहरणार्थ, या भागांवर मुरुम आणि पिटकुळ्यांचा त्रास होऊन वारंवार खाज सुटणे. यापैकी बर्‍याच प्रकरणांमध्ये कानात खाज सुटणे आणि कानाच्या समस्येमध्ये डोक्यातील कोंड्याची मोठी भूमिका असते.

कोंड्याच्या समस्येमुळे तुमच्या नखांमध्येही बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. म्हणजेच डोक्यातील कोंडा केवळ केसांसाठीच नाही, तर त्वचा आणि नखांसाठी देखील हानिकारक आहे. म्हणून, केस वेळेवर स्वच्छ करणे महत्वाचे आहे. म्हणूनच आम्ही आपल्याला एक सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण नैसर्गिकरित्या डोक्यातील कोंड्याच्या समस्येतून मुक्त होऊ शकता…

केसातील कोंड्याची वेगवेगळी कारणे :

आपल्या केसांतील कोंड्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. प्रत्येक वेळी या समस्येचे फक्त एकच कारण असणे आवश्यक नाही. त्याचप्रमाणे, एकाच वेळी वेगवेगळ्या लोकांमध्ये डोक्यातील कोंडाची कारणे देखील भिन्न असू शकतात. परंतु तरीही डोक्यात कोंडा होण्याची सर्वात सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत…

– मुलांमध्ये पोषण नसणे

– त्वचेची पीएच पातळी बिघडणे

– शरीरात पाण्याचा अभाव

– रासायनिक उत्पादनांचा अधिक वापर

– स्काल्प स्वच्छ न ठेवणे

लिंबाचा वापर करून कोंडा दूर करण्याचा उपाय

कोंड्याची समस्या मिटवण्यासाठी लिंबू आणि नारळ तेल उपयोगी ठरते. यासाठी आपल्याला 2-3 चमचे नारळ तेल आणि एका लिंबाची आवश्यकता आहे. प्रथम एका वाडग्यात 2 ते 3 चमचे नारळाचे तेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. जेव्हा दोन्ही घटक चांगले मिसळले जातील, तेव्हा हे मिश्रण कॉटन बॉलच्या सहाय्याने केसांच्या मुळांवर लावा.

हे मिश्रण केसांच्या मुळांवर कमीतकमी 1 तास सोडा. नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. रीठा, आवळा, कोरफड यासारख्या नैसर्गिक औषधी वनस्पती वापरून बनवलेल्या शाम्पूंचा वापर करावा (Hair care tips for dandruff using lemon and coconut oil).

अशा प्रकारे मिळतील जलद फायदे

लिंबू आणि नारळ तेल मिसळून केसांवर लावल्यास, हे मिश्रण शॅम्पूपासून होणारे नुकसान कमी करते. लिंबाच्या रसामध्ये आम्ल असते. यामुळे स्काल्प खाजण्याची समस्या कमी होते. तसेच, त्यातील अँटीफंगल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म डोक्याच्या त्वचेला संसर्गापासून मुक्त करतात.

नारळ तेलाचे फायदे

– केसांच्या मुळांना नारळ तेल लावल्याने स्काल्प कोरडी होत नाही. ज्यामुळे केसांत कोंडा होण्याची शक्यता कमी होते. यासह हे तेल आपल्या टाळूच्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्याचे कार्य करतो. यामुळे केसांमध्ये कोरडेपणा वाढत नाही आणि केसांना संपूर्ण पोषण मिळते.

– आठवड्यातून एक ते दोन वेळा लिंबू आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावल्यानंतर, केसातील डँड्रफची समस्या कायमस्वरूपी नाहीशी होऊ शकते.

यासह, आपल्याला आपल्या आहाराची काळजी घ्यावी लागेल आणि दररोज पुरेसे पाणी प्यावे लागेल. जेणेकरून आपल्या केसांना संपूर्ण पोषण मिळेल आणि टाळूची त्वचा ओलसर राहील. केस धुताना गरम पाणी नाही तर, कोमट पाणी वापरा. यामुळे केस खराब होतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Hair care tips for dandruff using lemon and coconut oil)

हेही वाचा :

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.