AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makar Sankrati Marathi Message : तिळगुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या, मकरसंक्रांतीसाठी प्रियजनांना द्या खास गोड शुभेच्छा !

मकर संक्रांतीला हळदी-कुंकू करून, तिळगुळ देऊन, एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात, लहान मुलांचं बोरन्हाण केलं जातं, पण सगळ्यांनाचा एकमेकांना भेटणं शक्य होत नाही. मग अशा वेळी व्हॉट्सॲप, मेसेज किंवा फोटोंद्वारे शुभेच्छा दिल्या जातात. तुम्हालाही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना या खास प्रसंगी खूप छान संदेशांच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्या असतील. तर हे मेसेजस नक्की वाचा, खास संदेश तुम्हीही प्रियजनांना पाठवू शकता.

Makar Sankrati Marathi Message : तिळगुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या, मकरसंक्रांतीसाठी प्रियजनांना द्या खास गोड शुभेच्छा !
मकर संक्रांतीच्या खास शुभेच्छा!
| Updated on: Jan 14, 2025 | 6:00 AM
Share

मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणाला लोक पतंगही उडवतात. मकर संक्रांती ही पीकांना उपयुक्त आणि प्रभावी संसाधने देऊन आशीर्वाद दिल्याबद्दल सूर्यदेवाचे आभार मानण्यासाठी साजरी केली जाते. उद्या 14 जानेवारी( मंगळवार) देशभरात मकरसंक्रांत साजरी करण्यात येणार आहे. नववर्षाच्या सुरूवातीलाच येणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी मकर संक्रांतीला हळदी-कुंकू करून, तिळगुळ देऊन, एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात, लहान मुलांचं बोरन्हाण केलं जातं, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा तिळवा केला जातो. हा सण देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. पण तो साजरा करण्यामागचा प्रत्येकाचा उद्देश एकच असतो. या दिवशी लोक चविष्ट खाद्यपदार्थ तयार करतात तिळगूळ, गुळाची पोळी, हलवा, अनेक पदार्थ घरी तयार केले जातात. आणि अनेक लोकं घराच्या गच्चीवरून पतंग उडवून एकत्र उत्सवाचा आनंद घेतात.

पण सगळ्यांनाचा एकमेकांना भेटणं शक्य होत नाही. मग अशा वेळी व्हॉट्सॲप, मेसेज किंवा फोटोंद्वारे शुभेच्छा दिल्या जातात. या सणानिमित्त तुमच्या प्रियजणांना शुभेच्छा संदेश पाठवण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. आज आपण असेच काही विशेष शुभेच्छा संदेश आणि व्हॉट्सॲप स्टेटस जाणून घेऊया.

मकर संक्रांतीसाठी शुभेच्छा संदेश

– कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

– कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो, असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या… मकरसंक्राती हादिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला

– तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत, नात्यातला आणि माणसांमधील गोडवा वाढवूया, मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला हार्दिक शुभेच्छा!

– परक्यांना ही आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला

– गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या, मनातील कटवटपणा बाहेर पडू द्या, या संक्रांतीला तीळगुळ खाताना, मनात आमची आठवण राहू द्या, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

– काळया रात्रीच्या पटलावर चांदण्यांची नक्षी चमचमते काळया पोतीची चंद्रकळा तुला फारच खुलून दिसते. पहिल्या संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा!

– तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास हॅप्पी मकर संक्रांती!

– जपू तिळाप्रमाणे स्नेह वाढवू गुळाप्रमाणे गोडवा , निर्माण करू भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा , मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला…

-आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

– तिळात मिसळला गूळ, त्याचा केला लाडू… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.