Clove Benefits | हाडे मजबूत होतील, मधुमेहावर नियंत्रण मिळेल, वाचा ‘लवंगा’चे असेच अनेक फायदे…

लहानशी दिसणारी लवंग सर्व प्रकारच्या औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. भारतीय खाद्यपदार्थात मसाला म्हणूनही लवंगीचा वापर केला जातो.

Clove Benefits | हाडे मजबूत होतील, मधुमेहावर नियंत्रण मिळेल, वाचा ‘लवंगा’चे असेच अनेक फायदे...
लवंग
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 5:57 PM

मुंबई : लहानशी दिसणारी लवंग सर्व प्रकारच्या औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. भारतीय खाद्यपदार्थात मसाला म्हणूनही लवंगीचा वापर केला जातो. लवंग खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. म्हणूनच, बर्‍याच प्रकारची औषधे तयार करण्यातही याचा उपयोग होतो. एका अभ्यासानुसार असे आढळले आहे की, लवंगामुळे यकृत आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारते. चला तर, लवंगाच्या औषधी गुणधर्मांबद्दल जाणून घेऊया…(Health Benefits of Clove)

लवंगाचे विशेष पोषक घटक

लवंगामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. म्हणूनच, आरोग्य तज्ज्ञांनी त्यास अन्नात समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. एका चमचे लवंगामध्ये दररोज आवश्यक असलेल्या 6 कॅलरी आणि 55 टक्के मॅंगनीज असतात. मेंदूचे कार्य योग्यप्रकारे सुरु ठेवण्यासाठी आणि हाडे मजबूत होण्यासाठी मॅंगनीज खूप महत्वाचे आहे.

भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स

या लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात, जे तीव्र आजारांना निमात्र्ण देणारे असतात. लवंगमध्ये युजेनॉल नावाचे एक कंपाऊंड असते जे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. अँटिऑक्सिडेंटयुक्त लवंगा खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं.

कर्करोगाचा प्रतिबंध करते

एका अभ्यासानुसार, लवंगामध्ये असे घटक आढळतात जे कर्करोगापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात. लवंग अर्क ट्युमर वाढण्यास प्रतिबंधित करते आणि कर्करोगाच्या पेशी नष्ट करते. लवंगामध्ये सापडलेल्या युजेनॉलमध्ये अँटीकेन्सर गुणधर्म असतात. लवंग सर्वायकल कर्करोगाचा प्रतिबंध करते.

जीवाणू नष्ट करते

लवंगामध्ये बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करणार्‍या प्रतिजैविक गुणधर्म असतात. लवंग तेल अन्नातील विषाणू नष्ट करण्यात मदत करते. लवंगचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म दातांसाठी देखील खूप चांगले मानले जातात. ते हिरड्यांच्या रोगाचा नाश करतात (Health Benefits of Clove).

यकृतासाठी फायदेशीर

संशोधन अभ्यासात असे आढळले आहे की लवंगामध्ये आढळणारी संयुगे यकृत आरोग्यासाठी चांगली आहेत. लवंगामध्ये आढळणारे युजेनॉल यकृताचे कार्य सुधारते, जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की एका आठवड्यासाठी युजेनॉलचे सेवन केल्याने ग्लूटाथिओन-एस-ट्रान्सफरेज एंजाइमची पातळी कमी होते आणि यकृत अधिक मजबूत होते.

रक्तातील साखर नियंत्रित करते

लवंगामध्ये आढळणारी संयुगे रक्तातील साखर नियंत्रित करतात. यामध्ये सापडलेला नायजीरिसिन हा एक महत्त्वाचा घटक, मधुमेहावरील रामबाण उपाय असून, पेशी सुधारण्यास मदत करतो. यामुळे, मधुमेह होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.

हाडे निरोगी होतात

बहुतेक लोकांना हाडांची समस्या असते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. ऑस्टियोपोरोसिसमुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. अभ्यासानुसार लवंगामध्ये आढळणारे युजेनॉल हाडांची घनता वाढवते आणि त्यांना बळकट करते. लवंगामधील मॅंगनीझ हाडांमध्ये रचनात्मक विकास करते.

पोटाचे अल्सर समस्या दूर करते

काही अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की, लवंगामुळे पोटातला अल्सर कमी होतो. पोटाच्या अल्सरला पेप्टिक अल्सर देखील म्हणतात. सामान्यत: ते संसर्गामुळे उद्भवतात. या लवंगाचा अर्क पोटातील अल्सरच्या उपचारात बर्‍याच अँटी-अल्सरेटिव्ह औषधांसारखे औषधांसारखे गुणकारी असल्याचे दिसून आले आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of Clove)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.