तज्ञांनी सांगितले मखाना रायता खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

मखाना आणि दही दोन्हीमध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे मखाना रायता खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे पोषक तत्वे देखील मिळतील. ते खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. चला जाणून घेऊया तज्ञांकडून याबद्दल

तज्ञांनी सांगितले मखाना रायता खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
Makhana Raita
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: May 29, 2025 | 1:13 PM

बदलत्या वातावरणामुळे आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण आहारात हेल्दी आणि पौष्टीक पदार्थांचा समावेश करत असतो. अशातच तुम्ही तुमच्या आहारात मखाना समावेश करण्याचा सल्ला तज्ञ देतात. कारण यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे मखाना हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्याचा परिणाम थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यातही ते खाणे चांगले राहील. बहुतेक लोकांना मखाना स्नॅक म्हणून खायला आवडते. मखान्याचे सेवन अनेक पद्धतीने केले जाते. याशिवाय मखाना रायता देखील बनवला जातो. तसेच मखाना वजनाने हलका असल्याने पचायला देखील सोपे आहे. तर आजच्या या लेखात तज्ञांनी मखाना रायता खाल्ल्याने आरोग्यास होणाऱ्या फायद्याबद्दल सांगितलेले आहे, चला तर मग जाणून घेऊया…

मखना रायता आरोग्यासाठी फायदेशीर

आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता सांगतात की, मखाना रायता नाश्ता म्हणूनही खाल्ला जाऊ शकतो. कारण मखाना रायत्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे. याशिवाय, ते शरीराला थंडावा देण्यास मदत करते. मखान्यात फॉस्फरस आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असल्याने तुमची हाडे मजबूत करण्यास मदत करतात. अशाप्रकारे मखाना रायता आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात ज्याच्या सेवनाने आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. पण मखाना मर्यादित प्रमाणातच सेवन करावे.

मखाना रायता असा बनवा

मखना रायता बनवण्यासाठी कढईत मखना तळून घ्या. यानंतर एका भांड्यात दही घ्या आणि ते फेटून घ्या. आता त्यात भाजलेला मखाना मिक्स करा, यासोबतच, तुमच्या आवडीनुसार जिरे पावडर, मीठ, काकडी आणि पुदिना टाका आणि चांगले मिक्स करा. तर हा तयार मखाना रायता तुम्ही जेवणासोबत याचे सेवन करू शकता किंवा नाश्ता म्हणून देखील खाऊ शकता.

याशिवाय तुम्हाला काही मेडिकल कंडिशन असेल तर त्यांनी मखाना रायता खाणे टाळावे. दही आणि मखाना दोन्ही कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. म्हणून, ज्या लोकांना स्टोनची समस्या आहे त्यांनी मखाना रायता खाऊ नये. याशिवाय मखाना आणि दह्यामध्येही प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. म्हणून, ज्या लोकांना किडनीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी मखाना रायता खाणे टाळावे. इरिटेबल बोवेल सिंड्रोम म्हणजे ज्यांना पोटात आम्लता किंवा फुगणे यासारख्या समस्या आहेत. त्यांनी मखाना रायता खाणे देखील टाळावे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)