AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Golgappa Benefits | चटपटीत पाणीपुरीचे असेही अनेक फायदे, वाचून व्हाल हैराण…

पाणीपुरी ही लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी एक चांगला आरोग्यदायी स्नॅक्सचा पर्याय असू शकते.

Golgappa Benefits | चटपटीत पाणीपुरीचे असेही अनेक फायदे, वाचून व्हाल हैराण...
पाणी
| Updated on: Jan 25, 2021 | 7:13 PM
Share

मुंबई : पाणीपुरी किंवा गोलगप्पे खाणे अगदी सर्वांनाच आवडते. हा पदार्थ देशातील सगळ्यात आवडता स्ट्रीट स्नॅक्स आहे. तथापि, असे बरेच लोक आहेत जे आपल्या आहाराबद्दल थोडेसे जागरूक आहेत आणि पाणीपुरी खाण्यास टाळाटाळ करतात. पाणीपुरी खाल्ल्याने वजनही कमी होते. होय! वाटले ना आश्चर्य… विश्वास बसत नसेल, तरी ही गोष्ट खरी आहे. वास्तविक, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यात ‘पाणीपुरी’ खूप मदत करते. एका पाणीपुरीमध्ये साधारण 36 कॅलरी असतात. जर, आपण पूर्ण प्लेट पाणीपुरी खात असाल तर आपल्याला 216 कॅलरी मिळतात (Health benefits of panipuri aka golgappa).

असे होईल वजन कमी!

पाणीपुरी खाल्ल्यानंतर भूक लागत नाही.

पाणीपुरी ही लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी एक चांगला आरोग्यदायी स्नॅक्सचा पर्याय असू शकते. जर आपण बर्‍याच दिवसांपासून डाएट करत असाल आणि आपल्याला त्वरीत वजन कमी करायचे असेल, तर 6 पाणीपुरींची एक प्लेट आपले वजन कमी करण्यास मदत करू शकेल. हे खाल्ल्याने कित्येक तास भूक लागत नाही. तसेच, पाणीपुरी खाण्याबरोबर तुम्हाला दररोज वर्कआउटही करावे लागेल.

पाणीपुरीच्या पाण्याचे बरेच फायदे…

आपल्याला पाणीपुरी आणि त्याच्या पाण्याचे बरेच फायदे मिळू शकतात. जर, तुम्ही पुदीना, जिरे आणि हिंगाचा वापर करून घरच्या घरी पाणीपुरीचे पाणी तयार केले, तर ते आपल्या पचनास उपयुक्त ठरेल. या पाण्यात आपण हिरवी ताजी कोथिंबीर देखील टाकू शकता. याने आपल्या शरीराला येणारी सूज कमी होईल.

पाणीपुरीच्या पाण्यातील हिंग मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करते. तसेच यातील जिरे पचन क्रिया सुधारण्यास मदत करते. पाणीपुरीच्या पाण्यात पचनास फायदेशीर ठरणारे अनेक गुणधर्म आहेत. यातील जिरे तुमच्या तोंडाला गंध देखील प्रतिबंधित करते. पुदिन्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट असतात जे पचनास मदत करतात. यामुळे पोटातील वेदना देखील कमी होतात आणि अपचन नियंत्रित करण्यास मदत होते. इरिटेबल बाउल सिंड्रोम असलेल्या रूग्णांसाठी हे अतिशय फायदेशीर आहे (Health benefits of panipuri aka golgappa).

गोड चटणी खाणे टाळा!

जर, आपल्याला पाणीपुरीतील आंबट किंवा तिखट पाणी आवडत नसेल आणि त्यात आपण गोड पाणी वापरत असाल, तर ते आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. म्हणूनच पाणीपुरीत शक्यतो आंबट किंवा पुदिनायुक्त पाणी वापरण्याचा प्रयत्न करा. पाणीपुरीच्या सारणासाठी बटाट्याचा वापर करण्याऐवजी हरभरा किंवा मूग स्प्राउट्सचे स्टफिंग बनवा. ते आरोग्यासाठी लाभदायी आहे आणि पाणीपुरीची चव देखील वाढवतात. अर्थात पाणीपुरी ही घरी बनवलेली असावी!

(टीप : वरील माहिती संशोधनावर आधारित असून, नियमित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(Health benefits of panipuri aka golgappa)

हेही वाचा :

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.