AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी

या हंगामात आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. या काळात आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी
आरोग्याची काळजी
| Edited By: | Updated on: Feb 28, 2021 | 8:45 AM
Share

मुंबई : आजकाल बदलत्या हवामानामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस थंड हवेचा झोत सध्या वाढत आहे. तर, दिवसभर तपमान जास्त असते. या हंगामात आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. या काळात आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आपल्या शरीराला उन्हाळ्याच्या काळात जास्त पाण्याची गरज असते. इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात प्रत्येकाने कमी कॅलरी युक्त अन्न खाणे आवश्यक आहे. विशेषत: तळलेले-भाजलेले आणि मसालेदार अन्न टाळावे. तसेच, आपल्या आहारामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश करा (Health care tips during climate change).

आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा, ज्यामुळे त्यांचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे आपण खोकला आणि सर्दीसारखे आजार दूर राहतील. याशिवाय सलाड आणि सहज पचेल असे अन्न खा.

हायड्रेशन

उन्हाळ्यात घामामुळे इलेक्ट्रोलाइट्सचे नुकसान होते. यामुळे, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे दररोज 4 ते 5 लिटर पाणी प्या. पुरेसे पाणी पिण्याने शरीर हायड्रेट राहते. अशावेळी आपण साध्या पाण्याऐवजी, लिंबाचे पाणी, ताक, नारळ पाण्याचे सेवन करू शकता. मद्यपान आणि हार्ड ड्रिंक पिणे कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.

त्वचेची काळजी

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावा. याशिवाय सुती कपडे घालावेत. नेहमी हलक्या रंगाचे कपडे घाला (Health care tips during climate change).

आहार

हंगामी संक्रमण टाळण्यासाठी आपला आहार हा एकमेव मार्ग आहे. आपल्या आहारात पौष्टिक अन्नाचा समावेश करा. रात्रीच्या वेळी हलके अन्न खा. सलाड, रस, सूप आणि स्मूदी खा. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

पायांची विशेष काळजी

उन्हाळ्यात बंद शूजऐवजी सँडल परिधान करा. यामुळे घाम कोरडा होईल आणि बुरशीजन्य संक्रमणास प्रतिबंध करेल. पाय अधून मधून सतत थंड पाण्याने धुवावेत, जेणेकरून आपल्याला आराम मिळेल.

वैयक्तिक स्वच्छता

उन्हाळ्याच्या दिवसांत दोनदा अंघोळ करा. आंघोळ केल्याने शरीर थंड होईल, तसेच शरीरावरील घाम आणि धुळ निघून जाईल. आपणास आवडत असल्यास, आपण आंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने घालू शकता. हे आपल्याला संक्रमणापासून वाचवेल.

(Health care tips during climate change)

हेही वाचा :

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

High Blood Pressure | केवळ मीठच नव्हे, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...