2. सूर्यनमस्कार : हे आसन शरीराच्या बहुतांश भागांवर सकारात्मक कार्य करते. हृदयाच्या स्नायूंना बळकट करण्यासोबतच गुढगे आणि पायांनाही बळकट करते. हे आसन रोज करा.
3. वृक्षासन : वृक्षासन तुम्हाला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही निरोगी ठेवते. असे केल्याने अनेक शारीरिक समस्याही आपल्यापासून दूर राहतात.
4. अधो मुख स्वानासन : हे आसन संपूर्ण शरीराला आराम देण्यास मदत करते. त्यामुळे हाताची ताकद वाढते. पाठीच्या कण्यासाठी फायदेशीर ठरते. हे आसन तुमच्या संपूर्ण शरीराला ऊर्जा देते.
5. कपालभाती : वयाच्या 30 वर्षांनंतर बहुतेक लोकांना वजन वाढण्याची समस्या असते. अशा स्थितीत हे योगासन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हे आसन चयापचय सुधारते. या योगासनाने ध्यान शक्ती वाढते.