AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात शॅम्पू न करताही तेलकट केसांना फ्रेश मुलायम करण्याचे ‘हे’ आहेत 4 सोपे उपाय

उन्हाळ्यात केसांना शॅम्पूने धुऊनही केसांमध्ये पटकन तेलकटपणा जमा होते. तर काही लोकांचे केस दुसऱ्या दिवशी चिकट होतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी वारंवार केस धुण्याऐवजी तुमचे केस फ्रेश मुलायम दिसण्यास मदत करणारे पाच उपाय आजच्या लेखात जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात शॅम्पू न करताही तेलकट केसांना फ्रेश मुलायम करण्याचे 'हे' आहेत 4 सोपे उपाय
Hair CareImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Mar 31, 2026 | 6:06 PM
Share

उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे तुमचे केस चिकट होतात. शिवाय दमटपणामुळे स्कॅल्पमध्ये सेबमचे उत्पादन वाढते, ज्यामुळे तुमचे केस तेलकट दिसू लागतात. तर ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही जेव्हा केस धुता तेव्हा सल्फेट-फ्री शॅम्पूचा वापर करा. तसेच उन्हाळ्यात केसांना जड तेल लावण्याचा वापर टाळा आणि आठवड्यातून किमान तीन वेळा केस धुवा. तसेच काही सोपे उपाय आहेत जे शॅम्पू न करताही केस फ्रेश ठेवतात.

उन्हाळ्यात त्वचेसोबतच केसांचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जसे की घराबाहेर जाताना टोपी किंवा स्कार्फ घातल्याने तुमच्या केसांचे अतिनील किरणांपासून आणि धुळीपासून संरक्षण होईल. याव्यतिरिक्त नेहमी हलक्या वजनाचा कंडिशनर निवडा आणि तो थेट टाळूवर लावणे टाळा. यासोबतच तेलकट केसांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आजच्या लेखात आपण शॅम्पू न वापरता केसांना ताजेतवाने ठेवण्याचे काही सोपे उपाय जाणून घेऊयात.

टिश्यूने स्कॅल्प स्वच्छ करा

तुमच्या केस ही उन्हातून आल्यावरही तेलकट दिसत नाही, पण स्कॅल्पजवळील केस मात्र तेलकट दिसतात. या तेलकट दिसण्याचे कारण म्हणजे स्कॅल्पवर सेबमचे (sebum) अतिरिक्त उत्पादन होणे. जर तुमचे केस लवकर तेलकट होत असतील, तर तुम्हाला फक्त टिश्यू किंवा ब्लॉटिंग पेपर घ्या आणि तुमच्या स्कॅल्पवर हळूवारपणे दाब देऊन स्कॅल्पमधील तेलकटपणा यामध्ये शोषला जाईल. यामुळे अतिरिक्त तेल निघून जाते आणि तुमचे केस फ्रेश दिसतात.

हेअर मिस्ट वापरा

उन्हाळ्यात तुमचे केस तेलकट होऊ नयेत म्हणून तुम्ही हेअर मिस्ट वापरू शकता. तुम्ही नैसर्गिक घटकांचा वापर करून हेअर मिस्ट घरीही बनवू शकता. यासाठी 10-15 पुदिन्याची पाने कुस्करून एका कप गुलाब पाण्यात टाका. त्यात इसेन्शियल ऑइलचे दोन ते तीन थेंब मिक्स करा. हे मिश्रण दोन ते तीन दिवस सामान्य तापमानावर तसेच राहू द्या. त्यानंतर ते तयार होईल. गरजेनुसार ते तुमच्या केसांवर स्प्रे करा.

हेअर रिन्स उपयोगी पडेल

सतत शॅम्पू केल्याने केसांमध्ये कोरडेपणा निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी तुम्ही हेअर रिन्स वापरू शकता. यामुळे तुमचे केस खोलवर स्वच्छ होतात आणि ते तेलकट दिसत नाहीत. यासाठी फक्त पाण्यात ॲपल सायडर व्हिनेगर मिक्स करा आणि त्या पाण्याने केस धुवा.

ड्राय शॅम्पू वापरा

तुम्ही तुमच्या केसांना फ्रेश आणि मुलायम दिसण्यासाठी लिक्विड शॅम्पूऐवजी ड्राय शॅम्पू वापरू शकता. यामुळे केस धुण्याची गरज भासत नाही आणि स्कॅल्पवरील अतिरिक्त तेल शोषले जाते, ज्यामुळे तुमच्या केसांना त्वरित ताजेपणा मिळतो. हा ड्राय शॅम्पू स्प्रे तुमच्या स्कॅल्पवर स्प्रे करा आणि काही मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर तुमचे केस विंचरा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने