AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनचा प्रवास करताना यात ७ चुका महागात पडतील, काय आहेत नियम वाचा….

भारतीय रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितेसाठी आणि ट्रेन प्रवासामध्ये शिस्त राखण्यासाठी अनेक नियम अधिक कडक केले आहेत. तिकीटशिवाय प्रवास करणे, महिलांच्या डब्यात चढणे, ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर धूम्रपान करणे आणि इतर काही नियमांचे उल्लंघन करणे पूर्वीपेक्षा अधिक महागात पडू शकते.

ट्रेनचा प्रवास करताना यात ७ चुका महागात पडतील, काय आहेत नियम वाचा....
indian railway
| Updated on: Jul 09, 2026 | 7:37 PM
Share

जर तुम्ही ट्रेनचा प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांची सुरक्षा आणि ट्रेनचे संचनल सुव्यवस्थित होण्यासाठी अनेक कठोर नियमांची निर्मिती केली आहे. विनातिकीट प्रवास करणे, महिला कोचमध्ये पुरुषाने चढणे, ट्रेन वा स्थानकात धूम्रपान करणे आणि काही नियमांचे उल्लंघन करणे जास्त महाग पडते. अनेक प्रकरणात तर रेल्वे घटनास्थळीच हजारो रुपयांचा दंड वसुल करु शकते. यासाठी प्रवास सुरु करण्याच्या आधी या नियमांचे पालन करणे महागात पडू शकते.

1. विनातिकीट प्रवास करणे महागात पडते

जर तुम्ही विनातिकीट ट्रेनमधून प्रवास करताना पकडले गेला तर तिकीटाचे भाडे देण्यासह दंड भरावा लागेल. दंडाची रक्कम, प्रवासाचे अंतर आणि परिस्थितीनुसार हा दंड आकाराला जातो.

2. महिला कोचमध्ये चढल्यास दंड

महिलांसाठी आरक्षित डब्यात विना परवानगी प्रवास करणारे पुरुष प्रवाशांच्या विरोधात रेल्वे कारवाई करु शकते. अशा प्रकरणात दंड आणि अन्य कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.

3. ट्रेन वा स्टेशनवर धूम्रपान करु नये..

जर कोणताही प्रवासी ट्रेन, प्लॅटफॉर्म वा रेल्वे परिसरात धूम्रमान करताना पकडला गेला. तर तुमच्याकडे २,००० पर्यंत दंड लावला जावू शकतो. दंड न भरल्यास प्रकरण कोर्टात जाऊ शकते.

4. रेल्वे सुविधाचा चुकीचा वापर करु नये..

वेटिंग रूम, आरक्षित आसन, प्लॅटफॉर्म वा अन्य रेल्वे सुविधांचा चुकीचा वापर करणे. त्यांना नुकसान पोहचवल्यावर रेल्वे कठोर कारवाई करु शकते. अशा प्रकरणात आधीपेक्षा जास्त दंड लावला जाऊ शकतो.

5. विना परवानगी साहित्य विकणे गुन्हा

जर कोणताही व्यक्ती ट्रेन वा स्थानकात विनापरवानगी साहित्य विकताना पकडला गेला तर त्याच्यावर २००० रुपयांपर्यंत दंड लावला जाऊ शकते.

6. ट्रेन वा स्टेशनवर भिक मागणे महागात पडतो

रेल्वेने भिक मागणाऱ्याविरोधात कठोर पावले उचलली आहेत. ट्रेन वा स्थानक परिसरात भिक मागताना पडकल्यानंतर २००० रुपयांपर्यंत दंड लावला जाऊ शकतो.

7. खतरनाक साहित्यासह प्रवास करणे गंभीर गुन्हा

रेल्वेत ज्वलनशील, विस्फोटक वा अन्य प्रतिबंधित सामानासह प्रवास करणे गंभीर गुन्हा म्हटला जातो. यात १० हजार रुपयांपर्यंत दंड लावला जाऊ शकतो. गंभीर प्रकरणात कायदेशीर कारवाई आणि जेलची सजा देखील होऊ शकते.

रेल्वे प्रवास करताना नियम माहिती हवेत –

रेल्वेच्या या नियमांचा उद्देश्य प्रवाशांची सुरक्षा वाढवणे आहे आणि ट्रेन प्रवासात शिस्त ठेवण्यासाठी हे नियम तयार केले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवास करण्याआधी नियमांची माहिती हवी आणि त्यांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा सामना करावा लागू शकतो. थोड्याश्या सावधानतेने मोठा दंड आणि अनावश्यक अडचणीपासून वाचता येऊ शकते.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे