Dental Care | दातांच्या समस्यांनी हैराण? मग, ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

बाजारात मिळणाऱ्या महागड्या टूथपेस्टचा वापर करूनही काही लोकांचे दात नीट स्वच्छ होत नाहीत आणि चमकत देखील नाहीत.

Dental Care | दातांच्या समस्यांनी हैराण? मग, ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
दातांच्या समस्या

मुंबई : असे बरेच लोक आहेत ज्यांना दातांच्या अनेक समस्या आहेत. बरेच लोक वारंवार तक्रार करतात की, बाजारात मिळणाऱ्या महागड्या टूथपेस्टचा वापर करूनही त्यांचे दात नीट स्वच्छ होत नाहीत आणि चमकत देखील नाहीत. तुम्ही देखील यासारख्या समस्यांनी हैराण असाल, तर आपल्या दातांसाठी काही घरगुती उपचार खूप प्रभावी सिद्ध होऊ शकतात (Home Remedies and tips for Dental Care).

दात स्वच्छ न होण्याबाबतच्या तक्रारी, तोंडाचा दुर्गंध दूर करण्यासाठी, तसेच पिवळ्या दातांची चमक पुन्हा परत मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय वापरून या समस्या दूर करू शकता. हे आपल्या दात आणि हिरड्यांसाठी खूप फायदेशीर ठरणारे आहेत. चला तर, मग जाणून घेऊया या सोप्या घरगुती उपायांबद्दल…

दातांच्या समस्येवर रामबाण उपाय :

– आपले दात चमकदार बनवण्यासाठी, एक चमचा खाण्याचा सोडा, एक चमचा बारीक मीठ आणि एक चमचा तुरटी पूड एकत्र करून एका डबीत भरून ठेवा. या चुर्णाने दररोज दात स्वच्छ करा.

– थोड्या बेकिंग सोड्यामध्ये ताज्या लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. आता एकदा दात टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घ्या. आता ब्रशच्या सहाय्याने ही तयार केलेली पेस्ट दातांवर लावा.

– मोहरीच्या तेलात मीठ मिसळून हे मिश्रण दररोज सकाळी आणि संध्याकाळ दातांवर लावा. यामुळे दातदुखी, हिरड्या दुखी आणि दातातून रक्तस्त्रावावर आराम मिळतो. यामुळे आपले दातही चमकदार बनतात.

– रोज सकाळी ब्रश करण्यापूर्वी, तोंडात एक चमचा खोबरेल तेल घ्या आणि त्याने व्यवस्थित चूळ भरा. पुढची 15 मिनिटे दातांवर ते तेल तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. काहीच दिवसांत दात एकदम पांढरे होतील (Home Remedies and tips for Dental Care).

– सकाळी ब्रश केल्यानंतर, एका ग्लास पाण्यामध्ये अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि त्याने खळखळून गुळण्या करा. याने तोंडाची दुर्गंधी नाहीशी होईल. परंतु, हे लक्षात ठेवा की आठवड्यातून दोनदा वेळेपेक्षा अधिक वेळा हा उपाय करू नका.

– संत्र्याची वळलेली साल तमालपत्र टाकून बारीक पूड करून घ्या. आता ही पावडर बोटावर घेऊन त्याने दात स्वच्छ करा.

– एक चमचा हळदीमध्ये एका चमचा खोबरेल तेल आणि 2-3 थेंब पुदिना तेल टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार पेस्ट दात स्वच्छ करण्यासाठी वापरा.

– ताजा कोरफड रस किंवा तयार जेलने आपले दात घासा. मग दातांवर काही वेळ मसाज करा आणि नंतर ब्रशने दात स्वच्छ करा. काही आठवड्यांत आपल्या दातांची चमक परत येईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Home Remedies and tips for Dental Care)

हेही वाचा :

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI