AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Caesarean Mark | सिझेरिअनच्या खुणा जात नाहीयत? मग, ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

सिझेरियन ऑपरेशननंतर शरीर आणि टाके यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ऑपरेशननंतर काही दिवस टाक्यांच्या जागी वेदना देखील जाणवते, परंतु वेळेप्रमाणे ती बरी देखील होते.

Caesarean Mark | सिझेरिअनच्या खुणा जात नाहीयत? मग, ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!
सिझेरियन ऑपरेशनमध्ये बाळ बाहेर काढण्यासाठी 6 इंचाचा कट बनवला जातो.
| Updated on: Feb 18, 2021 | 5:24 PM
Share

मुंबई : सिझेरियन ऑपरेशननंतर शरीर आणि टाके यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ऑपरेशननंतर काही दिवस टाक्यांच्या जागी वेदना देखील जाणवते, परंतु वेळेप्रमाणे ती बरी देखील होते (Home Remedies for Caesarean stich Mark).

सिझेरियन ऑपरेशनमध्ये बाळ बाहेर काढण्यासाठी 6 इंचाचा कट बनवला जातो, ज्याची जखम कालांतराने बरी होते, पण त्याजागी डाग राहतात. जेव्हा जेव्हा एखादी स्त्री हे डाग पाहते तेव्हा, तिला तिच्या ऑपरेशनची त्वचा आठवते आणि नकळत कधी कधी तिला वाईट देखील वाटते. जर आपल्यालाही ही समस्या असेल, आणि सिझेरिअनच्या खुणा लपवायच्या असतील, तर काही घरगुती उपचारांच्या सहाय्याने आपण सी-सेक्शनचे चिन्ह कमी करू शकता किंवा पूर्णपणे मिटवू देखील शकता.

व्हिटामिन ई तेल आणि कांद्याचा रस

टाके सी-सेक्शन डिलीव्हरीनंतरही तसेच राहतात. व्हिटामिन ई तेल आणि कांद्याचा रस एकत्रित करून लावल्याने डाग कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे डाग आणखी गडद होणे थांबते. यासाठी बाजारातून व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या, त्यातून तेल काढा आणि त्यात कांद्याचा रस मिसळा व दररोज या डागांवर वापरा. त्याच्या नियमित वापराने, डाग हळूहळू कमी होतील.

मध आणि कोकाआ बटर

त्वचेसाठी मध खूप फायदेशीर असते. मध डाग वाढण्यास प्रतिबंध करते. नैसर्गिक उपचार म्हणून मध उत्तम काम करतो, परंतु ते वापरण्यापूर्वी एकदा डॉक्टरांना विचारा. याव्यतिरिक्त, कोकोआ बटर देखील सीझेरिअन ऑपरेशनचे डाग कमी करू शकते. कोकोआ बटर एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. हे केवळ डाग कमी करण्यातच मदत करत नाही, तर जखम भरून काढण्यासाठी देखील मदत करते. कोको बटर क्रीमने या डागांवर मसाज करा. यामुळे डाग अधिक हलका होतो (Home Remedies for Caesarean stich Mark).

व्हिटामिन ई तेल आणि कोरफड तेल

डाग बरे करण्यास व्हिटामिन ई तेल फायदेशीर ठरते. या तेलाने मालिश केल्याने ऊती मऊ होतात आणि त्वचा लवकर बरी होते. हे तेल फारसे चिकट नसते आणि आपण ते कोणत्याही हंगामात वापरू शकता.

सिझेरिअन स्कार काढून टाकण्यासाठी आपण एलोवेरा जेल देखील वापरू शकता. आपण घराच्या घरी कोरफडच्या पानापासून जेल काढू शकता. कोरफड जेल टाक्यांचे डाग सौम्य करते. यामुळे त्वचेची जळजळ किंवा खाज सुटण्यापासूनही आराम मिळतो.

लिंबू

लिंबूचा उपयोग डाग व स्कार कमी करण्यासाठी केला जातो. कोणत्याही प्रकारचे त्वचेचे डाग किंवा सिझेरिअनचे डाग लिंबाने हलके केले जाऊ शकतात. लिंबू सिट्रस फळ आहे, म्हणून आपण लिंबाचा रस केवळ टाके पूर्णपणे भरल्यानंतरच लावावा. जेव्हा टाक्यांमुळे होणारी वेदना पूर्णपणे संपेल, तेव्हाच त्यावर लिंबाचा रस लावावा. जखम बरी होण्यापूर्वी लिंबाचा वापर करू नये.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Home Remedies for Caesarean stich Mark)

हेही वाचा :

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.