सकाळी रिकाम्या पोटी ‘हे’ पाणी प्यायल्यास निस्तेज त्वचाही होईल चमकदार, जाणून घ्या
त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली आणि निरोगी आहार खूप महत्त्वाचा आहे. अशा वेळेस जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर या पदार्थाचे पाणी प्यायले तर ते त्वचा निरोगी आणि चमकदार बनण्यास मदत करू शकते.

आजकालचे वाढते प्रदूषण, चुकीची जीवनशैली, अस्वस्थ खाण्याच्या सवयी यामुळे यासर्वांचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर देखील होऊ लागला आहे. यामुळे त्वचा निस्तेज दिसण्यासोबतच सुरकुत्या, मुरुमे आणि डाग दिसू लागतात. अशा वेळेस त्वचा निरोगी आणि चमकदार राहावी यासाठी अनेकजण महागडे स्किन केअर प्रोडक्ट आणि उपचारांचा अवलंब करतात. परंतु या काही गोष्टींचा त्वचेवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. खरं तर सर्वप्रथम तुम्ही त्वचा निस्तेज का होते कशामुळे होते या समस्येचे कारण जाणून घेणे आवश्यक आहे.
तर काहींना हार्मोनल बदलांमुळे मुरुमे आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्वचेवर सेबमचे अधिक प्रमाणात वाढणे, मृत त्वचेच्या पेशी साफ न करणे, पोटदुखी, ताणतणाव, अस्वस्थ आहार किंवा झोपेचा अभाव यामुळे देखील त्वचा निस्तेज दिसू शकते. अशा वेळेस तुमची त्वचा निस्तेज दिसत असेल तर सर्वात आधी यामागचे नेमकं कारण शोधणे आणि त्यानुसार उपाय करणे महत्वाचे आहे. चला तर आजच्या या लेखात आपण निस्तेज झालेली त्वचा पुन्हा चमकदार करण्यासाठी कोणते घरगुती उपाय केले पाहिजे ते जाणून घ्या…
तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकवा
आहारतज्ज्ञ मेधावी गौतम सांगतात की त्वचा निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाणे आणि शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे.
तर यासाठी रोज सकाळी तुम्ही लिंबू, संत्री, मोसंबी, पुदिना, आले आणि आवळा यापैकी कोणतेही एक गोष्ट घ्या आणि त्याचे बारीक काप करून रात्रभर पाण्यात भिजवा आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी रिकाम्या पोटी प्या. तुम्ही आले किसून पाण्यात भिजवू शकता. यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होऊ शकते.
तज्ञांनी सांगितले की डाळिंब, बीट, पपई, गोड लिंबू, संत्री किंवा टोमॅटो हे देखील त्वचेसाठी चांगले आहेत.
याशिवाय अळशीच्या बिया देखील त्वचेसाठी चांगले आहेत. कोरफड जेल किंवा आवळ्याचा रस त्वचेसाठी चमकदार ठेवण्यास मदत करतात. तुम्ही यांचा सरबत बनवून सकाळी देखील पिऊ शकता.
त्वचा चमकदार राहण्यास योग्य जीवनशैली आणि आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण आजकाल बहुतेक समस्या वाईट जीवनशैलीमुळे उद्भवतात. म्हणूनच नेहमीच चांगले अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून सर्वप्रथम तुम्ही हे लक्षात ठेवा. याशिवाय तुम्ही दररोज सकाळी पुदिना किंवा लिंबू पाणी देखील पिऊ शकता. यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. तसेच, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन सी आणि ई समृद्ध आहार घेणे उचित आहे.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
