AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भेसळयुक्त जॅमला आता निरोप द्या, घरीच बनवा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी ब्लूबेरी जॅम

बाजारात अनेक पदार्थ भेसळयुक्तच मिळत असतात, अशात डॉक्टर देखील घरातच आवडीचे पदार्थ बनवण्याचा सल्ला देतात. पण मुलांच्या आवडीचा जॅम घरी कसा तयार करायचा? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर जाणून घ्या घरीच स्वादिष्ट आणि आरोग्यदायी ब्लूबेरी जॅम बनवण्याची रेसिपी...

भेसळयुक्त जॅमला आता निरोप द्या, घरीच बनवा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी ब्लूबेरी जॅम
| Updated on: Oct 03, 2026 | 2:23 PM
Share

जॅम कोणाला आवडत नसेल, असे फार कमी लोकं असतील. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना जॅम आवडतो. पोळी, ब्रेडसोबत जॅम लावून खायला अनेकांना आवडतं. पण बाजारात मिळणारे तयार पॅकेज्ड जॅम हे अतिरिक्त शुद्ध साखर, कृत्रिम रंग, रासायनिक प्रिझर्व्हेटिव्ह आणि फ्लेवर्स यांनी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त असतात, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. अशा जॅममुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अशा वेळी, बाजारातील या भेसळयुक्त जॅमला निरोप द्या आणि ताज्या किंवा फ्रोझन ब्लूबेरी वापरून 100 टक्के शुद्ध, आरोग्यदायी आणि चविष्ट ब्लूबेरी जॅम सहजपणे तयार करा.

सुपरफूड मानल्या जाणाऱ्या ब्लूबेरीमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करतात. पेक्टिन किंवा कोणत्याही हानिकारक रसायनांशिवाय घरी घट्ट आणि स्वादिष्ट जॅम बनवणं खूप सोपं आहे. तर जाणून घ्या घरीच जॅम बनवण्याची रेसिपी…

सर्वात आधी जॅम बनवण्यासाठी लागणारं साहित्य जाणून घ्या. ब्लूबेरी: 2 कप, साखर: 3/4 कप साखरेच्या जागी तुम्ही पिठीसाखर किंवा साजूक साखर देखील वापरू शकता, ताज्या लिंबाचा रस: 1 मोठा चमचा, दालचिनी पूड: 1/2 छोटा चमचा… आता जाणून घ्या कसा बनवाल जॅम

सर्वातआधील ताज्या ब्लूबेरी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा चांगल्या प्रकारे धुवा आणि जास्तीचं पाणी निथळण्यासाठी छिद्र असलेल्या चाळणीत ठेवा. एका पातेल्यात साहित्य मिसळा, जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात स्वच्छ केलेल्या ब्लूबेरी, साखर आणि ताज्या लिंबाचा रस एकत्र घाला आणि त्याला उकळी येऊ द्या. पातेले गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. साखर हळूहळू विरघळू लागेल आणि ब्लूबेरीमधील नैसर्गिक रस बाहेर येऊ लागेल. चमच्याने मिश्रण सतत ढवळत राहा.

जेव्हा ब्लूबेरी किंचित मऊ होतील, तेव्हा त्यांना मॅशरने हलक्या हाताने मॅश करा, जेणेकरून जॅमला एक छान आणि गुळगुळीत पोत येईल. घट्ट होईपर्यंत शिजवा, हे मिश्रण मंद ते मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं शिजू द्या. मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागेल. जर तुम्हाला दालचिनी पावडर घालायची असेल, तर ती यावेळी घाला आणि चांगल्या प्रकारे ढवळा.

जॅम तयार आहे की नाही हे तपासण्यासाठी थंड प्लेटवर जॅमचा एक थेंब ठेवा. आता प्लेट थोडी तिरकी करा. जर थेंब खाली न घसरता एकाच जागी गोठून राहिला, तर समजून घ्या की तुमचा उत्तम जॅम तयार आहे. त्यानंतर गॅस बंद करा आणि जॅमला खोलीच्या तापमानावर पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तो घट्ट होईल. आता हा जॅम पूर्णपणे कोरड्या आणि निर्जंतुक काचेच्या बरणीत भरा आणि फ्रिजमध्ये ठेवा. हा घरगुती जॅम 2 ते 3 महिने खराब होत नाही.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू