AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूपच गळतायत केस? अनुष्का शर्मा वापरत असलेलं घरगुती जादुई टॉनिक वापरा; केस होतील दाट अन् लांब

केसांच्या गळण्याचं प्रमाण फारच वाढल असेल आणि केस विरळ होत चालले असतील तर यावर एक असा उपाय आहे ज्याने केसगळती तर थांबेलच पण केस लांब अन् दाट होतील. अभिनेत्री अनुष्का शर्मानेही हा उपाय करून पाहिला आहे. हे जादुई टॉनिक बनवायला फक्त 5 ते 10 मिनीटेच लागतात.

खूपच गळतायत केस? अनुष्का शर्मा वापरत असलेलं घरगुती जादुई टॉनिक वापरा; केस होतील दाट अन् लांब
| Updated on: Dec 28, 2024 | 5:38 PM
Share

केसरचनेमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झलक मिळते. पण आजच्या या धावपळीच्या जगात केसांची हवी तशी आपण निगा राखू शकत नाही. त्यामुळे आपल्याला केस वाढवण्याची कितीही हौस असली तरीही आपण केसांची निगा राखण्यासाठी वेळ मिळत नसल्याने केस कापून टाकतो. पण यावर एक उपाय आहे जो कदाचित तुम्हाला फार सोपा वाटेल.

निरोगी अन् लांबसडक केसांसाठी जादुई टॉनिक फक्त 10 मिनीटांत

जाड, लांबसडक आणि चमकदार केस मिळवण्यासाठी आपण अनेक उत्पादनांचा वापर करतो. मात्र, जास्त केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने केस गळणे, कमकुवत होणे, आणि नैसर्गिक चमक हरवणे यांसारख्या समस्या निर्माण होतात आणि त्यात वेळ, पैसा दोन्ही गोष्टी वाया जातात. योग गुरू कैलास बिश्नोई यांनी सांगितलेल्या या घरगुती उपायाने तुम्हाला केसांमध्ये जबरदस्त परिणाम दिसू शकतो. हा उपाय म्हणजे एक टॉनिक आहे जे घरच्या घरी बनवणं अगदी 5 ते 10 मिनीटांचे काम आहे.

हे टॉनिक अभिनेत्री अनुष्का शर्मासारख्या सेलिब्रिटींनीही ट्राय केलं आहे, जे केसांना मजबूत आणि आरोग्यदायी बनवतं. त्यामुळे आता या टॉनिकची चर्चा तशी सर्वत्र पसरली आहे. चला जाणून घेऊयात या टॉनिकची काय जादू आहे आणि ती कशी काम करत ते.

टॉनिक बवण्यासाठी लागणारे साहित्य

पाणी : 1 ग्लास चहा पावडर : 1 चमचा मेथी : 1 चमचा लवंग : 4 ते 5 तुकडे तेजपत्ता : 1 पान

याची कृती काय आहे? एका कढईत १ ग्लास पाणी घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवायचं. पाणी गरम झाल्यावर त्यात चहा पावडर,अगदी थोडेसे मेथी दाणे, 2 लवंग, आणि 1 तेजपत्ता टाका. हे मिश्रण व्यवस्थित उकळा, जेणेकरून सर्व घटकांचे पोषक तत्त्व पाण्यात उतरतील. मिश्रण थंड होऊ द्या, नंतर ते गाळून एका स्वच्छ बाटलीत भरून ठेवा. हे टॉनिक केसांच्या मुळांवर लावा आणि स्कॅल्पला मसाज करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरल्यास तुम्हाला लवकरच केसांमध्ये सकारात्मक बदल जाणवेल.

या टॉनिकचे फायदे

मेथीचे फायदे : मेथीमध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, फॉलिक अ‍ॅसिड, आणि इतर पोषक घटक असतात. हे केस गळणे कमी करतात, मुळांना पोषण देतात, आणि केसांना बळकट करतात.

चहा पावडरचे गुण : चहा पावडर केसांना काळसर बनवते आणि नैसर्गिक चमक आणते.

लवंग आणि तेजपत्ता : यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे डोक्याची खाज, फोड येणे, आणि एलर्जीचे प्रकार टाळले जातात.

केसांसाठी हा उपाय खरंच फायदेशीर आहे?

योग गुरू कैलास बिश्नोई यांनी सांगितलेला हा उपाय केवळ केसांच्या बाह्य सुंदरतेसाठी नाही, तर त्यांना आतून पोषण देतो. केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा हा उपाय नैसर्गिक आणि आरोग्यदायी आहे. नियमित वापर केल्याने केस अधिक लांबसडक, काळेभोर, आणि दाट होतात.

जर तुम्ही तुमच्या केसांबाबत चिंतित असाल, तर या उपायाचा अवलंब करा. नियमित वापराने तुम्हाला तुमच्या केसांच्या आरोग्यात आणि सौंदर्यात सकारात्मक बदल दिसेल.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.